भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...
'करून दाखवले!', असं काही कौतिकराव ठाले पाटील ह्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पण एखादी गोष्ट बोलून दाखवल्यावर करून दाखवण्याचाच त्यांचा खाक्या असतो. उदगीरच्या निमित्तानं ते (पुन्हा एकदा) सिद्ध झाल्याचं दिसून येतं. उदगीर बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पण साहित्य संमेलनाशी संबंधित असणाऱ्यांना माहिती हवीच ती गोष्ट म्हणजे उदगीरला 'डोळे सरांचं कॉलेज' आहे. 'प्राचार्य' हे त्यांचं पुस्तक 'वाचलंच पाहिजे' ह्या प्रकारात मोडणारं. लातूर जिल्ह्यातील ह्या तालुक्याच्या मुख्यालयी दोन-अडीच महिन्यांत कधी तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याच्या अध्यक्षाची निवड नव्या वर्षातल्या पहिल्या रविवारी एकमताने झाली. (छायाचित्र सौजन्य marathi.abplive.com) अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या नव्या प्रथेनुसार संमेलनाध्यक्षाची निवड बिनविरोध किंवा 'एकमताने' झाली. प्रसिद्ध लेखक भारत सासणे ह्यांना हा बहुमान मिळाला. त्यासाठी त्यांना त्यांच्या कथांप्रमाणेच प्रदीर्घ वाट पाहावी लागली. आता सत्तरीत असले, तरी श्री. सासणे 'हिंडते-फिरते' आहेत. 'संमेलनाचे अध्यक्ष ह...