मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आठवणी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'वर' बांधलेल्या गाठी आणि हुकलेल्या गाड्या!

‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...

निमित्त एका गाण्याचं...

तंत्रज्ञानाच्या जगात एका क्लिकवर हवं ते गाणं मिळतं. पण रेडिओच्या जमान्यात अनपेक्षितपणे एखादं आवडतं गाणं लागण्यात असलेली जादू ह्या प्ले-लिस्टमध्ये आहे? अलेक्साच्या माध्यमातून, पण रेडिओवरच नुकतीच एक सुरांची खिडकी उघडली आणि... ------------ 'जल बिन मछली...'मधल्या एका गाण्यामुळं हे सगळं लिहिलं! .......... हजारो नव्हे, लाखो गाण्यांचं भांडार असलेली संकेतस्थळे उपलब्ध आहेत. वेळ कसा घालवायचा, असं कुणी विचारलं तर सांगतो, 'ह्या संकेतस्थळांना भेट द्या. शंभर वर्षांचं आयुष्य लाभलं आणि दिवसातले बारा तास निव्वळ गाणी ऐकवण्यात घालवले तरी एक संकेतस्थळही संपणार नाही. आता एवढं ऐकायला उपलब्ध आहे.' 'रोज एवढा वेळ गाणी ऐकून बहिरेपण तेवढं येईल!' जन्मजात औरंगजेब असलेला मित्र त्यावर म्हणाला. सांगायचा मुद्दा वेगळाच आहे. अर्थात गाण्याचाच आहे. एखादं गाणं अचानक मनात आलं, तर ते ऐकण्यासाठी आता वाट पाहावी लागत नाही. चुटकीसरशी शोधून ऐकता येतं. मध्यंतरी अशी आवडती गाणी शोधून ऐकत होतो. काही वेळा तर एकच गाणं सलग पाच-सहा वेळा ऐकत होतो. उदाहरणार्थ - कारवाँ गुज़र गया... (आता हे लिहिल्यावर ऐकावंच लागेल.)...

पुरुषोत्तम बोरकर नावाच्या लेखकाचा मृत्यू

मराठी साहित्याजगताला ‘मेड इन इंडिया’सारखा अस्सल देशी ऐवज देणारा भन्नाट लेखक ‘इक जगह हो तो कहें, दर्द इधर होता है...’ म्हणत जगत राहिला. आयुष्यातील ‘दर्द’वर तो उपरोधाचे मलम लावत राहिला. विनोदाची शाई शिडकावत राहिला. लेखनावर जगण्याचे स्वप्न पाहणारा  पुरुषोत्तम बोरकर नावाचा ‘अक्षरस्नेही’  लेखक अचानक निघून जातो, तेव्हा कळते की, ‘दर्द इधर होता है!’ --------------- मधल्या काळात बरेच दिवस माझ्या इ-मेलची ‘ सिग्नेचर ’ दोन ओळींची होती. नंतर ती बदलली. त्या ओळी फार नकारात्मक वाटतात . शक्य असतील तर बदलाव्यात, असं एकानं सुचवलं म्हणून. त्या जागी नवीन काही आलं नाही. सर से सीने तक कही , पेट से पाव तक कही इक जगह हो तो कहें , दर्द इधर होता है... अशा त्या ओळी कुठून घेतल्या होत्या, हे पक्कं माहीत आहे. पुरुषोत्तम बोरकर ह्यांच्या लिखाणातलं आणि मनाला भिडलेलं होतं ते. हे त्यांच्या पुस्तकात आहे की, त्यांनी पाठविलेल्या कुठल्या इ-मेलमध्ये, ते शोधावं लागेल. ‘ सिग्नेचर ’ मधल्या त्या ओळी उडवल्या. मनातून काही खोडल्या गेल्या नाहीत. ही गोष्ट शुक्रवारची (दि. १९ जुलै २०१९). ‘ फेसबुक ’ पाह...
html