अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...
इतिहासाचे जुने साक्षीदार ऐसे एक आटपाट ' नगर ' पौरजनांचा सदा चाले गजर शहर माझे भले । नगरी ही नावाने शेलाटी नसे काना , मात्रा , वेलांटी नित्य नवी मारी कोलांटी राजकारण तिथले । पाहण्या नगराचा कारभार पालक संस्था ' महा ' फार निधीच्या अभावी आजार तिला सदा नि कदा । तिथे एकदा जाण्याकरिता म्हणे सेवक होण्याकरिता आटापिटा जिवाचा करिता इच्छुकांची तोबा दाटी । फूल पाकळ्यां चे कोणा हाती कुठे वाघोबाचा होतसे हत्ती येई ल त्याला पावन करिती दत्तकविधान पवित्र । निवडणुकीचा खेळ मजेदार घ्यावे दोन नि द्यावे चार खरे पाहता असे व्यवहार छनछनाट सा रा । कोणा गरिबा दाखवावा गुत्ता कोणासी करून द्यावा रस्ता कोणा एखाद्याची मालमत्ता द्यावी छान रंगवोनी । होता जाहीर तो निकाल लागे अनेकांचा निक्काल फास ला विजयाचा गुलाल अडुसष्टांच्याच माथी । बहुमता साठी संख्या अपुरी न लागे एक नाव किनारी नवागत अश्व उभे बाजारी लिलावासाठी सिद्ध। याचे आणि त्याचे जमेना त्याला शूत्रविना करमेना आकडेमोडीनंतरही जुळेना सत्तेचे समीकरण...