भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...
राजकीय रंगभूमीवरचे दोन हुकमी एक्के. महानायक आणि महानायिका. दोन पिढ्यांचा वारसा सांगणाऱ्या 'बाई'. शून्यातून विश्व निर्माण केलेले 'भाई'. विचारसरणी, काळ वेगळा; जनमानसावर गारुड करण्याची, सत्ता राबवण्याची शैली मात्र तीच! २०१५मध्ये लिहिलेला हा लेख आजही तेवढाच ताजा वाटेल. ह्या दोन दिग्गजांची तुलना करणारा मराठी पत्रकारितेतील (बहुदा) पहिला लेख... ------------------ आपल्याला राजकारण कळतंय , असा (गैर)समज झाल्यापासून एकच नाव ऐकत आलो. त्यांना सारे ‘ बाई ’ म्हणत. प्रेमाने , आदराने , भीतीने , उपहासाने , तुच्छतेने. असे म्हणण्यामागे काहींची भावना त्यांना देवपण देण्याची आणि काहींची अनुल्लेखाने मारण्याच्या गंडाची. आपल्याला राजकारणाचा कंटाळा आलाय , असा (पुन्हा) (गैर)समज झाल्यापासून एकच नाव ऐकत आलो. त्यांना सारे ‘भा ई ’ म्हणतात. प्रेमाने , आदराने , भीतीने , उपहासाने , तुच्छतेने. असे म्हणण्यामागे काहींची भावना त्यांना देवपण देण्याची आणि काहींची अनुल्लेखाने मारण्याच्या गंडाची. आधी ‘ बाई ’ आणि आता ‘भा ई ’ . जगातली सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या (हे प्रत्ये...