मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

'वर' बांधलेल्या गाठी आणि हुकलेल्या गाड्या!

‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...

ब्रिटनच्या निकषांनुसार हे वाङ्मयचौर्यच! - अँड्र्यू लिलिको

अँड्र्यू लिलिको (छायाचित्र सौजन्य - http://www.europe-economics.com ) ............ ‘लोकसत्ता’च्या ‘कोविडोस्कोप’ सदरातील ‘मिठीत तुझिया’ लेखावरून वाङ्मयचौर्याचा मोठा वाद निर्माण झाला. लंडनचे अर्थतज्ज्ञ अँड्र्यू लिलिको यांच्या ब्लॉगमधील मजकूर वापरल्याचा थेट आरोप सोशल मीडियावर करण्यात आला. ह्या संपूर्ण प्रकरणावर खुद्द मूळ ब्रिटिश लेखक अँड्र्यू लिलिको ह्यांनी ‘खिडकी’शी साधलेल्या संवादात रोखठोक भूमिका मांडली. वाङ्मयचौर्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांची विशेष इ-मुलाखत... ---------------- ' आ मच्याकडील, ब्रिटनमधील निकषांनुसार हे अगदी सरळ सरळ वाङ्मयचौर्य आहे !' अर्थतज्ज्ञ अँड्र्यू लिलिको यांनी ' खिडकी ' शी इ-मेलवरून साधलेल्या संवादात असे स्पष्ट म्हटले आहे... ' एखाद्या लेखकाची मूळ साहित्यकृती पूर्णतः वा अंशतः दुसऱ्या लेखकाने स्वतःच्या नावे प्रसिद्ध करून ती स्वतःची असल्याचे भासविणे, ह्यास ' वाङ्मयचौर्य ' म्हणतात... मूळ साहित्यकृती लपविणे, किंवा रूपांतरात तिचा मुळीच उल्लेख न करणे, ह्याला ' वाङ्मयचौर्य ' असे संबोधतात... वाङ्मयचोरी ही कायदेशीररीत्या...

एकलव्याची एकसष्टी

' कु ठंय ? ' वाजणारा फोन उचलल्याबरोबर हा प्रश्न कानावर आदळतो. ' मी कुठंही असेन, काय बोलायचंय ते बोल की... ' मनातल्या मनात उत्तर देतो. तसं स्पष्ट बोलायची सोय नसते. ' काय साहेब, झाली का झोप ? ' सकाळी कधी तरी फोन येतो आणि अशी विचारणा होते. ' झोपलो असतो, तर फोनवर बोललो असतो का ?' चरफडत विचारलेला हाही तर्कशुद्ध प्रतिप्रश्न मनातल्या मनात. ' हो ना... मी तेच म्हणतो. ' फोनवरच्या संवादात हे विधान किती तरी वेळी ऐकायला मिळतं. 'हो का!  इथून पुढं तूच सगळं म्हणत जा नं... ' असं म्हणावं वाटतं  मग . हेही अर्थात मनातच ! तसं बोलण्याचं धाडस अजून कधी केलं नाही. पुढेही होणार नाही. फोनच्या पलीकडच्या बाजूला असतो निर्मल. म्हणजे निर्मचलचंद्र थोरात. अशी उत्तरं दिल्यामुळं तो दुखावला वगैरे जाईल, अशी काही भीती वाटत नसते. तो दुखावून घेणार नाही, ह्याची खात्री असते. असं काही विचारल्यावर तो हसणार आणि आपला राग, चीड निष्फळ ठरवणार. तो माझा मूड अजमावू पाहत असतो. म्हणजे मी त्याच्यापेक्षा वयानं, कर्तृत्वानं मोठं असल्यासारखं. वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे. ...

बातमीच्या पलीकडे...बळीचा बकरा?

सरकारचे, प्रशासकीय यंत्रणेचे अपयश लपवण्यासाठी माध्यमांना 'बळीचा बकरा' बनवले जाते का? कोविडमुळे लॉकडाऊन असताना एप्रिल २०२०मध्ये वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर उसळलेली गर्दी, एबीपी माझाच्या पत्रकाराला झालेली अटक, त्यावरून रंगलेले 'सोशल मीडिया ट्रायल'चे राजकारण आदीचा सडेतोड वेध. --------------- सा धारण तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी (म्हणजे सरत्या वर्षाच्या अखेरीस - डिसेंबर २०१९) एबीपी माझा वृत्तवाहिनीने ' डिजिटल महाराष्ट्र ' असा दिवसभराचा परिसंवाद आयोजित केला होता. त्यातील एक सत्र '' ट्रोल ' धाडी ' बद्दलचे होते. सामाजिक माध्यमांवर कसं, किती नि कोणत्या पातळीवर जाऊन ' ट्रोल ' केलं जातं, ह्याचे किस्से व भीषण अनुभव एक अभिनेता, एक सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी त्यात सांगितले. पुढच्या वर्षी ह्याच विषयावर सत्र आयोजित करून त्यात ' एबीपी माझा ' चे संपादक राजीव खांडेकर आणि प्रतिनिधी राहुल कुलकर्णी ह्यांना बोलायला सांगितलं पाहिजे. कारण दोघांनी गेले दोन दिवस ह्याचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. निमित्त वांद्र्यात झालेल्या गर्दीचं. वांद्र्यात म...
html