मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

'वर' बांधलेल्या गाठी आणि हुकलेल्या गाड्या!

‘त्या गाठी’ तिथे कोठे तरी ‘वर’ बांधल्या जातात म्हणे. काही वेळा ती गाठ अतिशय मुलायम असते, तर काही वेळा घट्ट बांधली जाते. त्यावर नंतरचे आयुष्य स्वर्ग ठरते की नरक, हे अवलंबून असते. अर्थात त्याचा गाठीच्या मुलायमपणाशी किंवा घट्टपणाशी संबंध असतोच, असे ठामपणे म्हणता येणार नाही... हे सर्व तत्त्वज्ञान (ओढून-ताणून) इथे आणणे विनाकारण नसून सबल कारणपरत्वे आहे. लग्नाला कितीही वर्षं झाली तरी बाईची माहेरपणाची ओढ काही संपत नाही. माहेरपेक्षा दुप्पट वर्षं सासरी राहिल्यानंतरही एखादी बाई नवऱ्याला ‘आमच्या घरी अशी पद्धत नव्हती बाई...’ असं सांगते, तेव्हा त्यातला वाच्यार्थ नव्हे तर लक्ष्यार्थ लक्षात घ्यायचा असतो. त्या वाच्यार्थातही तुम्ही लक्ष्य असता, ही गोष्ट वेगळी... काही कामानिमित्त अशाच काही महिला आपल्या मूळच्या गावी आल्या होत्या. ते काहींचे माहेर, काहींचे सासर, तर एखादीचे सासर आणि माहेरही! त्यामुळे गप्पांचा सूर ‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाट तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट...’ असा सारा गदगद झालेला. त्यांनी पाहिलेलं, अनुभवलेलं गाव आता स्वाभाविकच तसं राहिलं नव्हतं. पण त्यांच्या आठवणीत तेच जुनं चित्र असणं स्...

‘मी बोललंच पाहिजे असं नाही’

  (सौजन्य : https://en.wikipedia.org ) घरात रेडिओ सुरूच असायचा. करमणुकीचं तेव्हाचं ते एकमेव साधन होतं. ‘ पुणे ’ , ‘ मुंबई ब ’ आणि ‘ सिलोन ’ ही केंद्रं त्यावर आलटून-पालटून चालू असत. पुणे-मुंबई केंद्रांवरची गाणी कानावर पडत राहिली. खूप खूप वेळा ऐकून ऐकून त्यातली काही आवडायला लागली. आधी संगीत, मग स्वर आणि शेवटी शब्द, असा तो कळण्याचा जमाना होता. लिहायला-वाचायला शिकल्यावर ही गाणी मंगेश पाडगावकरांची आहेत, हे समजलं. त्यातल्या काहींनी आनंदाच्या क्षणी साथ दिली, काहींनी रिकाम्या वेळेत गुणगुणायला मदत केली आणि काहींनी एकटेपणी अधिक हळवं केलं ! ‘ कविता ’ फारशी कळत नाही ; पण तरीही छोटा-मोठा, लोकप्रिय, एकांतप्रिय, शब्दप्रिय, शब्दबंबाळ... असे कवी आणि कविता अनुभवानंतर जाणवायला लागल्या. मंगेश पाडगावकर ‘ गीतकार ’ म्हणून अधिक आवडीचे. या महान कवीशी थेट बोलण्याची संधी एकदाच मिळाली. अगदी समोरासमोर. एक-दीड मिनिटाचाच तो संवाद होता. माझा थेट प्रश्न आणि त्यांचे नेमकं, मोजक्या शब्दांतलं उत्तर. एकवीस वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे हा. 14 फेब्रुवारी 1995. महाराष्ट्रप्रांती तेव्हा व...

शेतकरी आंदोलनाचा जिवंत दस्तऐवज : योद्धा शेतकरी

शरद जोशी यांच्या निधनाच्या बातमीनं अस्वस्थ व्हायला झालं.  ज्यांच्या लिखाणातून तरुणपणी शरद जोशी समजत गेले, त्या विजय परुळकर यांच्या ‘ योद्धा शेतकरी ’ पुस्तकाबद्दल... हे २०१०मध्ये दैनिक लोकसत्तातील पुस्तकवाटा सदरात लिहिलं होतं. ----------- मागच्या गळीत हंगामात (२०१४) उसाची टंचाई भासेल, असा साखर कारखानदारांचा अंदाज होता. हंगामाच्या सुरुवातीलाच कारखानदारांनी घोषणांचा दणका उडवून दिला. शेतकऱ्यांना आपल्याकडे वळवलं पाहिजे ; त्यांचा ऊस आपल्याच कारखान्याला आला पाहिजे. म्हणून मग त्यांनी पहिलाच हप्ता एकवीसशे-बावीसशे रुपये टनाप्रमाणं जाहीर केला. मागच्याच वर्षी साखरेचे दर वाढले होतो. कारखानदार खुशीत होते. नंतर दर घसरले. कारखानदार नाराज झाले. त्यांनी बैठक घेतली. किमान अमूक-तमूक भावापेक्षा कमी दरानं साखर विकायचीच नाही, असा निर्णय घेतला. संघशक्ती. उद्याच्या हंगामात उसाचा पहिला हप्ता किमान अडीच हजारांचा मिळावा, असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला तर ? बहुतेकांचा ऊस शेतातच वाळून जाईल. तो पेटवून द्यायची वेळ येईल. ३०० रुपये टन भावासाठी आंदोलन तीस वर्षांपूर्वी उसाला ३०० रुपये टन भाव मिळावा,...

चला खाऊ, नगरला जाऊ!

नगरच्या खाद्यजीवनावर लिहिलेला हा लेख दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीत खाद्ययात्रा सदरामध्ये १२ ऑगस्ट २०१२ रोजी प्रसिद्ध झाला. त्याचं शीर्षक होतं - ‘ नगरचा झालाय ‘खाया’पालट’ . तो नंतर ‘व्हॉट्सॲप’वर कसा कोण जाणे ‘व्हायरल’ झाला.­ नगरमधल्या अनेक ग्रूपवर तो आला. मला स्वतःला सहा जणांनी पाठवला. म्हणूनच मग ठरवलं त्याला आपल्या ‘खिडकी’ तही जागा देऊ. ते इंग्रजीत म्हणतात ना ‘ओल्ड वाईन इन न्यू बॉटल..’ अगदी तसंच! ------------- नगरच्या कापडबाजारात रात्रीच्या वेळी गर्दी असते ती खवय्यांची. ....... उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध नगरचा कापडबाजार दिवसा गजबजलेला असतो. इथंच रात्रीही गर्दी दिसते. दिवसाची गर्दी खिसा हलका करवून घेऊन खरेदीच्या भारानं तृप्त झालेली असती. रात्रीची गर्दीही तृप्त ; पोटावरून हात फिरवत ढेकर देत असते. खिसा फारसा हलका न होताच तिला हे समाधान लाभतं.  ‘ स्नॅक ’ , पाव-भाजी , सँड विच , ‘ कच्ची दाभेली ’ , ‘ फ्रूटस्लार्ड ’ , लस्सी , ‘ डबल मलई मार के ’  गरमागरम दूध , सोबत डिंकाचा लाडू असं बरंच काही काही त्यांनी कापडबाजारातल्या ‘ चौपाटी ’ वर ‘उदरस्थ ’   केलेलं असतं.   नगर. सा...
html