मुख्य सामग्रीवर वगळा

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

अफाट, अचाट...अर्थात विराट!

 


एकच नंबर...

टी-20 विश्वचषकातील आपला पहिला सामना साडेपाच वाजता संपला. त्यानंतरच्या साडेतीन तासांत, आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांतून ‘विराट कोहली’ अशी अक्षरं लक्षावधी वेळा उमटली असतील. उमटत राहतील. विशेषणांचा वर्षाव झाला असेल. होत राहील. त्याची छायाचित्रं असंख्य क्रिकेटप्रेमींनी एकमेकांना पुढे पाठवली असतील. त्याच्या त्या दोन षट्कारांची क्लिप कोट्यवधी डोळ्यांनी पुनःपुन्हा पाहून, कितव्यांदा तरी दाद दिली असेल. विराटचं कौतुक होत आहे नि होत राहील.

कोणत्या तरी वृत्तपत्रात उद्या ‘‘विराट’ खेळी’, ‘कोहलीमुळे भारताचा ‘विराट’ विजय’ अशा शीर्षकांनी बातम्या प्रसिद्ध होतील. ती अनेक वेळा वापरली गेली असली, तरी उद्या मात्र शिळी वाटणार नाहीत.

विराटची आजची कामगिरीच तशी होती. अफाट, अचाट, विस्मयकारक, लाजवाब, अफलातून, खिळवून ठेवणारी... विशेषणं कमी पडावीत अशी. विशेषणांना विशेषणं लावावीत अशी.

सामन्याच्या आधी राष्ट्रगीत झालं. ते संपता क्षणी कर्णधार रोहित  भाववश झाला. त्याची ती छबी पाकिस्तानचा डाव संपेपर्यंत साथीसारखी सर्व दूर गेली. डावऱ्या, शिडशिडीत, तरण्याबांड अर्षदीप सिंग ह्यानं कर्णधार बाबर आजमला अगदी यष्ट्यांसमोर पकडलं. महंमद रिजवानला उसळत्या चेंडूच्या सापळ्यात बरोबर अडकवलं.

एखाद्या सज्जन, आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणं मैदानावर वावरणाऱ्या भुवनेश्वरकुमारनं पहिल्या दोन षट्कांत प्रतिस्पर्ध्यांना मोकळेपणाने श्वास घेऊ दिला नाही.

अशा अवघड परिस्थितीतून शान मसूद आणि इफ्तिकार अहमद ह्यांच्या जोडीने वाट काढली. विराटसारख्या कसलेल्या क्षेत्ररक्षकाचा नेम चुकला नि जोडी फुटता फुटता राहिली. विराटच्याच उत्कट प्रयत्नांनंतरही झेल त्याच्या समोर काही अंतरावर पडला. रविचंद्रन अश्विन फूटभर आधीच थांबता झाला आणि सहज होणारा झेल निसटला. नंतर आपल्याच गोलंदाजीवर साभार परत आलेला फटकाही त्याला पकडता आला नाही. तेव्हा वैतागलेल्या रोहितचा चेहरा कॅमेऱ्याने टिपलाच.

अक्षर-अश्विन ह्या फिरकी जोडीची झालेली पिटाई, मग हार्दिक पंड्याचे तीन बळी, सूर्यकुमार यादवचे दोन झेल, भारतीय गोलंदाजांनी अलीकडच्या ‘लौकिकाला’ जागत एकोणिसाव्या षट्कात दिलेल्या चौदा धावा...

राहुलनं यष्ट्यांवर ओढवून घेतलेला चेंडू, उजव्या यष्टीवरून हलकेच बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेड काढण्याचा रोहितला न  आवरलेला मोह, पहिल्याच चेंडूवर खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार वसूल करणारा नि नंतर अपेक्षाभंग करणारा सूर्यकुमार...

चाळीस षट्कांच्या आणि जेमतेम साडेतीन-चार तासांचा अवकाश असलेल्या ह्या सामन्यांतील बहुतेक साऱ्या गोष्टी विसरल्या जातील.


स्टेडियममधला तो फलक आणि विराटचा उंचावलेला हात
सांगतोय - 'जिंकलो रे...'
लक्षात राहील विराट आणि हार्दिक ह्यांची शतकी भागीदारी. विराटनं शेवटच्या दोन षट्कांत टाकलेला टॉप गीअर.

लक्षात राहील कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळवलेला अटीतटीचा विजय.

लक्षात राहील दिवाळीच्या एकच दिवस आधी फटाक्यांचा दणदणाट करण्याची विराटने दिलेली संधी.

एखाद्या कुशल स्थापत्यविशारदाने डौलदार, टुमदार, देखणी इमारत टप्प्याटप्प्याने उभी करावी आणि अंतिमतः तिचं दर्शन झाल्यावर तोंडात बोट घालण्याला पर्याय नसावा, तशीच ही विराटची खेळी. मैदान मोठं आहे, हे समजून फटक्यांची आतषबाजी करण्याचा मोह टाळून एकेरी-दुहेरी आणि आता फार कमी वेळा पाहायला मिळणाऱ्या तिहेरी धावा घेण्यासाठीची त्याची ती चित्ता-चपळाई. संधी मिळताच तणाव दूर करणारे उत्तुंग फटके. अश्विनने फटका मारल्यावर  विजयी धाव पूर्ण केल्यानंतर यष्ट्यांभोवती थिरकलेले विराटचे पाय आणि जमिनीवर बसून काही करणारा विराट...

पाकिस्तानविरुद्धची लढत जिंकली. तब्येत खूश झालेले आपण भारतीय पुन्हा म्हणू - बस्स! आज विश्वचषक जिंकला!! पुढे काय व्हायचंय ते होऊ द्या...

तिसऱ्या-चौथ्या स्टंपातला फरक न कळणारे अनेक सोशल मीडिया पंडित विराटला संघाबाहेर बसवा, असं गेला काही काळ बोलत आहेत. त्यांच्यासह साऱ्या क्रिकेटरसिकांना विराटनं आज अप्रतिम भेट दिली.


काय खेळलाय गडी!
आपण कोणत्या दर्जाचे फलंदाज आहोत, हे विराटनं आज (पुन्हा एकदा) सिद्ध केलं! त्याच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम, सर्वाधिक आकर्षक आणि हुशारीने रचलेल्या डावांमध्ये आजचा डाव हुकुमाचा असेल, हे नक्की!

‘किंग कोहली’ कौतुकानं म्हणतात.

आजच्या खेळीनं ‘किमयागार’ दिसला. स्वच्छ. लखलखीत. खणखणीत.

......

#टी20 #टी20_विश्वचषक #भारतxपाकिस्तान #विराट_कोहली #विराट_खेळी #दिवाळी_भेट

...........

(छायाचित्रं सौजन्य : ईएसपीएनक्रिकइन्फो आणि आयसीसी ह्यांची संकेतस्थळं)

.........

सोबतच वाचा - परदेशी माध्यमांकडून कौतुकाचा वर्षाव 

https://khidaki.blogspot.com/2022/10/SuperHero.html

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ---------- हा लढा केवळ एका अक्षराचा नाही. मराठीच्या अस्मितेचे अढळपद टिकवून ठेवण्याचा संघर्ष आहे.  'तिलक' किंवा 'जलगाव' ही मोडतोड थांबविण्यासाठी पुण्याच्या श्री. प्रकाश निर्मळ ह्यांनी केंद्रीय मंत्रालयांपर्यंत चिवट पाठपुरावा केला. केंद्रीय हिंदी संचालनालयाने अखेर विस्तारित वर्णावलीत 'ळ'  स्वीकारला. ऋग्वेदापासून ते आधुनिक उपबोलींपर्यंत ५० कोटी जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या 'ळ' अक्षराची ही रंजक भाषिक यात्रा. सोबत प्रकाश निर्मळ ह्यांची मुलाखत... ---------------- ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्...

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...
html