मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

स्वप्न इंग्रजीत, अडचण मराठीत!

नांदेडला झालेल्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अभिनेत्री काजोल आमंत्रित होती. तिला मग   ‘ दोन शब्द ’  बोलण्याची विनंती झाली. तिच्या मराठीपणाचा आणि मराठी कुळाचा अभिमानाने उल्लेख करण्यात आला. काजोल बोलायला उठली आणि मराठीत बोलताना गडबडू लागली. तिनं त्याच गडबडीत अक्षरशः दोन शब्द संपवले. तिला सावरून घेताना लफ्फेदार साडीतील सूत्रसंचालिका तेव्हा म्हणाली होती , ‘ काजोलचा की नै ,  मराठीचा थोडा प्रॉब्लेम आहे! ’ नेमका हाच प्रॉब्लेम आमच्या अथर्वचा होता. फक्त भाषा बदलती. त्याला इंग्रजीची अडचण होती. आईचा आग्रह असतानाही अथर्वच्या बाबांनी त्याला जाणीवपूर्वक मराठी शाळेत घातलं होतं. पहिलीपासून इंग्रजी असूनही अथर्वला त्यात गती नव्हती.   ‘ रेन रेन गो अवे ’  आणि   ‘ हम्प्टी डम्प्टी ’  याच्या पलीकडे त्याची इंग्रजीची गाडी पुढं सरकत नव्हती. एकदा तर त्यानं आईला लाज आणली. दुसरीतल्या अथर्वचं मैत्रिणींपुढं कौतुक करताना ती म्हणाली होती , ‘‘ आमचा अथ्थू एका दमात ए टू झेड आणि वन टू हंड्रेड म्हणतो. ’’  मग तिनं त्याच कौतुकभरल्या नजरेनं अथर्वला खुणावलं हो...

... त्याचंच तर टेन्शन!

विकासला गेल्या रविवारी तसा थोडा उशीरच झाला. ठरलेल्या हॉटेलात गेला ,  थोडं इकडं-तिकडं पाहिलं आणि एका कोपऱ्यात अजय दिसला. कुठे तरी शून्यात बघत असल्यासारखा. त्याला वाटलं आपली वाट बघून कंटाळलेला दिसतोय. व्यंग्यचित्र किमया : कृत्रिम बुद्धिमत्ता (A. I.) ------------ भरलेली टेबलं आणि बशा घेऊन फिरणाऱ्या वेटरना चुकवत विकास टेबलाजवळ गेला. तो खुर्चीत बसला ,  तरी अजयचं लक्ष काही गेलं नाही. तो आपला भकास चेहऱ्यानं कुठं तरी नजर लावून बसलेला. चुटक्या वाजवत विकासनं त्याची तंद्री मोडली.  ‘‘ कसल्या विचारात आहेस रे बाबा ?  मी येऊन बसलो ,  तरी तुझं लक्ष नाही... ’’ अजयनं विकासकडं पाहिलं ,  पण काही बोलला नाही. त्या ऐवजी त्यानं एक सुस्कारा टाकला. विकास चमकला.  ‘‘ काय झालं रे ?  कसलं टेन्शन आहे ?  एकदम गप्प गप्प.. ?’’ टेबलावरचा पाण्याचा ग्लास उचलून अजयनं एका दमात रिकामा केला. म्हणाला , ‘‘ तसं म्हणशील तर टेन्शन नाही काही. पण आहे थोडंसं... ’’ विकासच्या तोंडावरचं प्रश्नचिन्ह ओळखून आणि ते तोंडातून बाहेर पडायच्या आधीच त्याला हातानं  ' थांब ,  ...

संख्या अल्प नि कर्तृत्व अफाट असलेला पारशी समाज

कुठल्या निमित्तानं कुठून कुठं जाता येतं, याची कल्पना आज आली. निमित्त फेसबुकचं. निमित्त ‘ पतेती ’ चं... अर्थातच पारशी नववर्षदिनाचं. निमित्त झालं फेसबुकवरील एका टिपणाचं. निमित्त दिलं प्रदीप रस्से यांनी... जळगावकर रस्से यांनी आपल्या पारशी मित्राला पतेतीच्या शुभेच्छा देण्यासाठी फेसबुकवर छोटं टिपण लिहिलं. त्यात त्यांचा लाडका बेहेराम काँट्रॅक्टर डोकावून गेलाच... तर त्यांचा तो छोटा परिच्छेद आवडून गेला. त्यावर प्रतिक्रिया लिहायला बसलो आणि हा लेख प्रसवता झालो. म्हणजे हा प्रवास ‘ लाईक ’ च्या अंगठ्यापासून, प्रतिक्रियेपासून स्वैर लेख लिहिण्यापर्यंत. हा प्रवास ‘ फेसबुक ’ पासून ‘ खिडकी ’ पर्यंत ! विचार करायला लागल्यावर लक्षात आलं, आपल्याला पारशी समाजाबद्दल तशी फारशी काही माहिती नाही. त्यांच्याबद्दल फार काही वाचलंही नाही. ‘ पारशी ’ म्हटल्यावर सर्वांत आधी आठवतात ‘ टाटा. ’ शाळेच्या इतिहासात शिकलेले दादाभाई नवरोजी नंतर. पारशी माणसं भेटली नाहीत ; भेटली असली तरी आठवणीत नाहीत. पण पु. ल. देशपांडे यांनी रेखाटलेली ` वल्ली ` आणि असंच काहीबाही वाचून त्यांच्याबद्दल आपुलकी मात्र वाटू लागली. ` अंतर्नाद...

विलक्षण गतिमान थरारपट!

विलक्षण उत्कंठापूर्ण लढतीचा पाया रचणारी खेळी हरमनप्रीतकौरने केली. .................................... ठरावीक काळानं विजयाचं पारडं इकडून तिकडे झुकावं... आनंदाच्या लाटेवर तरंगत असलेल्यां च्या पोटात भीतीनं गोळा यावा... डोळ्यांसमोर दिसणारा आणि हातात घ्यायचाच बाकी राहिलेला विजय डोळ्यांदेखत निसटतो की काय , असंही वाटावं... दडपण, भीती, ईर्षा, आनंद, उत्साह, जल्लोष... विविध भावनांचं दर्शन घडविणारा सात-साडेसात चाललेला एक थरारपट , विलक्षण गतिमान ! महिला विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा दुसरा उपान्त्य सामना असा उत्कंठावर्धक ठरला. झटपट क्रिकेटमध्ये दिसणारी आणि प्रेक्षकांना मनापासून पाहायला आवडणारी चौकार-षट्कारांची आतषबाजी इथं दिसली. पण त्याहून दिसली ती जबरदस्त स्पर्धा, जिंकण्याची आणि लढल्याविना पराभव न पत्करण्याची मनोवृत्ती. कोणत्याही खेळाचा आत्मा असलेली जिगरबाज वृत्ती. याच लढतीत आपल्या महिला क्रिकेट संघानं ` अपेक्षाभंग ` केला! सलग दुसऱ्या सामन्यात... बलाढ्य इंग्लंडविरुद्ध दणदणीत विजय नोंदवून भारतीय महिलांनी विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत जोरदार सलामी दिली. मग पाकिस्तानविरुद्धच्या आश्वास...

चौकट छापणाऱ्याची न छापली जाणारी चौकट

हे चित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार करून घेतले आहे. (श्रेय : गूगल जेमिनाय) ................................ वृत्तपत्रांच्या बंदिस्त चौकटीत आणि ‘दुर्मिळ’ विशेषणाखाली अडकलेल्या ‘प्रामाणिकपणा’ची  ही शोकांतिका. सर्वसामान्य सायकलस्वाराचे हरवलेले पाकीट स्वतःचे डिझेल-पेट्रोल जाळून, रात्र जागवून एका त्याच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या एका माध्यम कर्मचाऱ्याची ही गोष्ट. स्वतःचा दिवा स्वतः होण्याची, म्हणजेच ‘अत्त दीप भव’ची जिवंत आणि चौकटीबाहेरची कहाणी... ................... ‘प्रामाणिकपणा’ म्हणजे सद्गुण किंवा संस्कार मानतो आपण. तो हल्ली सहसा वृत्तपत्रांमधल्या चौकटीत पाहायला मिळतो, असं म्हणतात. त्या सजविलेल्या चौकटीत छापल्या जाणाऱ्या बातमीमध्ये ‘प्रामाणिकपणा’ या शब्दामागे ‘दुर्मिळ’ असं विशेषणही बहुदा लावलं जातं. पण ह्या गुणाचं मोल पत्रकारांनाही आता तेवढं वाटत नसावं, असं ‘प्रामाणिकपणे’च वाटतं. कारण अशा काही ‘दुर्मिळ’ बातम्या चौकटीविनाही थोडक्यात छापल्या जातात. लक्षात येतील, न येतील अशा. ‘न जाणो, यापासून कोणी प्रेरणा वगैरे घेतली, तर काय! मग उद्या कदाचित अशाच बातम्या आपल्या अंकातील जागा भरून टाकत...
html