मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

पदकांच्या दिशेने काही पावले

टोकियो ऑलिंपिकचे यजमान असलेल्या जपानचा शुक्रवारी भारतीय हॉकी संघानं दणदणीत पराभव केला. गोल केल्यानंतर गुजरंतसिंग ह्याने (उजवीकडे) सहकाऱ्यांसोबत जल्लोष केला. (छायाचित्र सौजन्य - 'द हिंदू'/ए.पी.) टोकियो ऑलिंपिकमध्ये पहिल्या दिवसाच्या रुपेरी यशानंतर आपल्या पदरी काहीच पडलेलं नाही. असं असलं तरी शुक्रवारची (दि. ३० जुलै) वाटचाल मात्र काही पदकांच्या दिशेने झाली, एवढं नक्की. त्याचं श्रेय प्रामुख्यानं सिंधू, मुष्टियोद्धा लवलिन आणि पुरुषांचा हॉकी संघ ह्यांना जातं. बाकी ॲथलेटिक्समध्ये आपली कामगिरी सुमार झाली. मराठमोठ्या अविनाश साबळेनं टोकियोत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली, हेही लक्षणीय. मनप्रीतसिंगच्या संघानं गटातील शेवटच्या सामन्यात यजमान जपानला ५-३ अशी मात दिली आणि दुसरं स्थान, उपान्त्यपूर्व फेरी पक्की केली. ह्या सामन्यात पूर्वार्धातील पहिल्या भागात सहाव्या मिनिटाला विवेकसागर प्रसादचा फटका गोलरक्षक योशी का वा तकाशी ह्यानं अडवला. बाराव्या मिनिटाला सामन्यातला पहिला पेनल्टी कॉर्नर भारताला मिळाला आणि ती संधी साधली हरमनप्रीत सिंगने. त्यानंतर लगेचच सिमरनजित सिंगने दोन वेळा आक्रमण केलं. ...

दुर्लभ दर्शन पदकाचे

  ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - ८ शिखर गाठणं सोपं; तिथं टिकून राहणं, फार कठीण असंत म्हणतात. ऑलिंपिकमध्ये हॉकीचा सुवर्णकाळ अनुभवल्यानंतर शिखरावर जाणं सोडाच; त्याचं दर्शनही आपल्याला दुर्लभ झालं. लॉस एंजेलिसपासून भारतीय हॉकी संघ कधीच उपान्त्य फेरीत गेला नाही. त्याचा प्रवास पाचवा ते आठवा क्रमांक असा घसरणीचा राहिला. त्याला अनेक कारणे सांगता येतील. सहस्रकातील शेवटच्या - सिडनी ऑलिंपिकमध्येच आपण उपान्त्य फेरीपर्यंत आलो होतो. पण शेवटच्या सामन्यातील शेवटच्या मिनिटाची ढिलाई आपल्याला तेथे नेण्यात असमर्थ ठरली. अटलांटा ( १९९६ ) आधुनिक ऑलिंपिकची शताब्दी साजरी करणाऱ्या ह्या स्पर्धेत मान्यताप्राप्त सर्व १९७ राष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे संघ सहभागी झाले. दिग्गज मुष्टियोद्धा महंमद अली ह्याच्या हस्ते ऑलिंपिकची ज्योत पेटविण्यात आली. भारतीय चाहत्यांना हॉकी संघाकडून अपेक्षा होत्या. त्या फलद्रूप झाल्या नाहीतच; उलट संघ अजून एक पायरी खाली उतरला! पण काहीसा दिलासा दिला तो लिएंडर पेस ह्याने. टेनिसच्या एकेरी स्पर्धेत त्याने कांस्यपदक पटकाविले. कुस्तीगीर खाशाबा जाधव ह्यांच्यानंतर भारताचे हे पहिलेच व्यक्तिगत पदक होय. पुर...

पदक राहिले दूर दूर

  ऑलिंपिक, भारत आणि हॉकी -  ७ लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये चमकलेला तारा - विनितकुमार. (छायाचित्र सौजन्य sportskeeda.com) 'खेळात राजकारण नको,' हे उद्गार व्यासपीठावरून काढून टाळ्या मिळतात. पण व्यवहार तसा नसतो. राजकारणातून ऑलिंपिंकवर बहिष्कार टाकण्याच्या खेळामुळे असेल, पण मॉस्को ऑलिंपिकमध्ये भारताला हॉकीचे सुवर्णपदक पुन्हा मिळविता आले. त्यामुळे काही काळ खंडित झालेलं सुवर्णयुग पुन्हा चालू झालं, असं चाहत्यांना वाटलं. ते समाधान अल्प काळचंच होतं, हे पुढं दिसून आलं. त्यानंतरच्या तिन्ही स्पर्धांमध्ये आपली कामगिरी खालावतच गेली. क्रमाक्रमाने आपण एक एक पायरी उतरत गेलो.  लॉस एंजेलिस ( १९८४ )   अर्धशतकानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा ऑलिंपिकचे यजमानपद स्वीकारले. मॉस्को ऑलिंपिकवरील बहिष्काराचा बदला म्हणून सोव्हिएत रशियानेही तेच अस्त्र उगारल्याने काही खेळांवर परिणाम झाला. असे असूनही सहभागी देशांच्या संख्येचा नवा विक्रम झाला - एकूण १४० देश. भारतीय हॉकी संघ पदकाच्या शर्यतीत असेल, असे मानले जात होते. पण ते होणार नव्हते. आपली उपान्त्य फेरीची संधी थोडक्यात हुकली. संघाचे प्रशिक्षक बालकिशन सिंग ह्...

वर्चस्वाला सुरुंग

ऑलिंपिक, भारत आणि हॉकी -  ६ उपान्त्य सामन्यात पराभव. पाकिस्तानी आक्रमकाचा फटका अडविण्यात भारतीय बचावफळीला अपयश. समाधान कांस्यपदकावर. (छायाचित्र सौजन्य scroll.in) म्यूनिच, माँट्रिअल आणि मॉस्को... हे प्रत्येक ऑलिंपिक भारतीय हॉकीला, तिच्या चाहत्यांना वेगळाच अनुभव देऊन गेले. अंतिम फेरी हुकण्याचा अनुभव मेक्सिको सिटीप्रमाणं म्यूनिचनंही दिला. पण तिथंही किमान कांस्यपदक तरी मिळालं, ह्याचं समाधान होतं. पण तेही माँट्रिअलमध्ये हिरावलं गेलं. एकच वर्ष आधी विश्वचषक जिंकणारा हा संघ साखळीतच गारद झाला. मॉस्कोमध्ये भारतानं आठवं सुवर्ण जिंकलं खरं; पण ते यश म्हणावं तेवढं चोख नव्हतं. जगातले बहुतेक बलाढ्य देश स्पर्धेत सहभागी नसतानाही भारताला सर्व सामने जिंकता आले नाहीत. तथापि भळभळत्या जखमेवर त्या सुवर्णपदकाची तात्पुरती मलमपट्टी झाली, एवढं मात्र खरं. म्यूनिच ( १९७२ ) पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी ‘ऑलिंपिक व्हिलेज’वर केलेल्या भीषण हल्ल्याने या ऑलिंपिकची इतिहासात वेगळीच नोंद झाली. अगदी तशीच नकोशी नोंद हॉकीतील अंतिम सामन्यानंतर झाली. अंतिम सामन्यात यजमान पश्चिम जर्मनीकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू, संघ...

घसरगुंडीला सुरुवात

ऑलिंपिक, भारत आणि हॉकी -  ५ हक्क भारताचाच. ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यास सुरुवात केल्यापासून भारतीय संघाने सुवर्णपदक कधी गमावले नव्हते. पण ते चित्र कायम राहणारे नव्हते, ह्याची चुणूक रोममधील खेळाने दाखविली. पाकिस्तानने सुवर्णपदक पटकावून आपली परंपरा खंडित केली. ते आपले हॉकीतील एकमेव रौप्यपदक होय. ह्या पराभवाचा बदला आपण टोकियोत घेतला खरा; पण उतरण चालू झाली होती. त्याचे लख्ख दर्शन मेक्सिको सिटीच्या स्पर्धेत झाले. तिथे भारताला पहिल्यांदाच गटात पराभव स्वीकारावी लागला. त्या आधी टोकियोमध्ये भारताचा ऑलिंपिकमधील सामना पहिल्यांदाच बरोबरीत सुटला होता. मेक्सिकोमध्ये तर भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. पश्चिम जर्मनीला हरवून भारताने कांस्यपदक जिंकले. रोम (१९६०) कृष्णवर्णीय आफ्रिकी धावपटू अबेबे बिकिला ह्याच्या कामगिरीमुळे गाजलेल्या ह्या ऑलिंपिकमध्ये हॉकीतही नवा इतिहास लिहिला गेला. सुवर्णपदकांचा षट्कार मारणाऱ्या भारताची शानदार वाटचाल रोममध्ये खंडित झाली. ती करणारा देश होता पाकिस्तान. जपानचा पुन्हा प्रवेश झाला, तर अफगाणिस्तानचा संघ दीर्घ काळानंतर नव्हता. सहभागी १६ संघांचे चार गट करण्यात आले. प्रत्ये...