भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...
नांदेडला झालेल्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या
कार्यक्रमाला अभिनेत्री काजोल आमंत्रित होती. तिला मग ‘दोन शब्द’ बोलण्याची विनंती झाली. तिच्या मराठीपणाचा आणि मराठी कुळाचा
अभिमानाने उल्लेख करण्यात आला.
काजोल बोलायला उठली आणि मराठीत बोलताना गडबडू लागली. तिनं त्याच गडबडीत अक्षरशः दोन शब्द संपवले. तिला सावरून घेताना लफ्फेदार साडीतील सूत्रसंचालिका तेव्हा म्हणाली होती, ‘काजोलचा की नै, मराठीचा थोडा प्रॉब्लेम आहे!’
नेमका हाच प्रॉब्लेम आमच्या अथर्वचा होता.
फक्त भाषा बदलती. त्याला इंग्रजीची अडचण होती.
आईचा आग्रह असतानाही अथर्वच्या बाबांनी त्याला जाणीवपूर्वक मराठी शाळेत घातलं होतं. पहिलीपासून इंग्रजी असूनही अथर्वला त्यात गती नव्हती. ‘रेन रेन गो अवे’ आणि ‘हम्प्टी डम्प्टी’ याच्या पलीकडे त्याची इंग्रजीची गाडी पुढं सरकत नव्हती.
एकदा तर त्यानं आईला लाज आणली. दुसरीतल्या अथर्वचं मैत्रिणींपुढं कौतुक करताना ती म्हणाली होती, ‘‘आमचा अथ्थू एका दमात ए टू झेड आणि वन टू हंड्रेड म्हणतो.’’ मग तिनं त्याच कौतुकभरल्या नजरेनं अथर्वला खुणावलं होतं. तिने सांगितल्याप्रमाणे त्यानं खरंच एका दमात ‘ए टू झेड’ आणि ‘वन टू हंड्रेड’ एवढे सहाच शब्द उच्चारले!
तर ते असो. यथावकाश अथर्व पुढच्या इयत्तेत जात राहिला.
इंग्रजीत पासापुरते मार्क मिळवित राहिला. आता तो आठवीत गेला. आईनं त्याच्या
बाबांचं काही न ऐकता त्याला हट्टानं ‘सेमी-इंग्लिश’च्या तुकडीत टाकलं. गणित-विज्ञान इंग्रजीतून शिकताना अथर्व
बिचारा घायकुतीला आला.
तसा अथर्व चांगला मुलगा. आज्ञाधारक, गृहपाठ नियमित पूर्ण करणारा, काही खेळात भाग घेणारा, स्नेहसंमेलनात छोट्या नाटुकल्या करणारा, हिंदी गाण्यांवर सामूहिक नाचणारा... इंग्रजीच्या सरांना
त्याची थोडी दया आली. ‘यू इज द गुड टीचरर’ हे अथर्वचं इंग्रजी त्यांच्या पचनी पडत नव्हतं. त्याचं
इंग्रजी सुधारायचंच, असा त्यांनी चंग बांधला.
वाघिणीचं दूध त्याला पचवायला लावायचंच, असा निश्चय करून त्यांनी आठवड्यातले दोन तास त्यासाठी खास
खर्च करायचं ठरवलं.
![]() |
| व्यंग्यचित्राची किमया : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ---------------- |
अथर्वनं एकदा घसा खाकरला आणि म्हणाला, ‘‘सर, प्लीज कम हिअर...’’
खूश झालेल्या सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांकडे अभिमानाने
पाहिलं आणि अथर्वकडे जाऊन म्हणाले, ‘‘आता तू मला त्या कोपऱ्यात जायला सांग बघू...’’
अथर्व क्षणभर गोंधळला आणि लगेच तरातरा पलीकडच्या कोपऱ्यात
गेला. तिथनं म्हणाला, ‘‘सर, प्लीज कम हिअर!!’’
सरांची बोलतीच बंद झाली. त्यांनी मग खूप विचार केला. एके
दिवशी ते अथर्वला म्हणाले, ‘‘अथ्थू, तुझं इंग्रजी नक्कीच चांगलं होईल. त्यासाठी एक कर... तू
स्वप्नंही इंग्रजीतच पाहत जा.’’
सरांच्या या सांगण्यावर अथर्वनं विचार केला. दोन दिवसांनंतर
तो मधल्या सुटीत सरांना भेटला आणि म्हणाला, ‘‘सर, तुम्ही म्हणता तसं झालं
हं. मला काल इंग्रजीतनंच स्वप्न पडलं.’’
उत्तेजित झालेल्या सरांनी विचारलं, ‘‘वा, वा. काय स्वप्न पडलं?’’
‘‘मी एका मोठ्या सभागृहात उभा होतो सर. खूप लोक होते तिथं.
सगळे जोरजोरात एकमेकांशी इंग्रजीत बोलत होते, इंग्रजीतच हसत होते,’’ अथर्वनं सांगितलं.
‘अरे वा!’, असं म्हणत सरांनी विचारलं, ‘‘काय बोलत होती ही सगळी मंडळी?’’
.....

जी अवस्था इंग्रजीची झाली आहे, तीच मराठी व इतर भाषांचाही झाली आहे. कारण एकच की इंग्रजीचा अतिहव्यास आणि त्यामुळे आपल्या मातृभाषेकडे होणारं कमालीचं दुर्लक्ष . यामुळे तो विद्यार्थी `धोबी का कुत्ता...` होतो आहे . पालकांनी विचार करणं आवश्यक आहे .
उत्तर द्याहटवा- प्रा सुरेश जाधव, नांदेड
Best
उत्तर द्याहटवा