भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...
देशात खरोखरच अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे का? ‘मधुमेही’ आणि ‘कावीळग्रस्त’ परस्परांवर तुटून पडत आहेत ते ह्याच मुद्द्यावर. सत्ताधारी आणि लेखक-कलावंत ह्यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, नगरमधील विभागीय साहित्य संमेलनात (नोव्हेंबर २०१७) रंगनाथ पठारे व रामदास फुटाणे ह्यांनी भाष्य केले ते सत्ताधाऱ्यांना सुनावणारे. त्याचे विश्लेषण... ---------------------- नरेंद्र मोदी ह्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर येऊन साडेतीन वर्षं झाली आहेत. ह्या सरकारला जनतेकडून पुढचा कौल मिळविण्यासाठी अजून दीड वर्षाचा काळ बाकी आहे. म्हणजे २०१९. लोकसभेच्या २०१४च्या निवडणुकीआधीच, भाजपनं नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं, तेव्हापासून (म्हणजे गेली जवळपास साडेचार-पाच वर्षं) देशाचं राजकारण बहुतांशी याच नावाभोवती फिरत राहिलं आहे - आत्यंतिक लोभ आणि पराकोटीचा द्वेष, ह्या ध्रुवांमध्ये आणि तरीही मध्यबिंदूजवळ कधी न थबकलेलं. मधुमेही ‘ भक्त ’ आणि कावीळग्रस्त ‘ द्वेष्टे ’ ह्या सरकारबद्दल आणि त्याच्या नेतृत्वाबद्दल टोकाची मतं व्यक्त होत आहेत. मधुमेही ‘ भक्त ’ ...