मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

सरकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखक आणि चिंता

देशात खरोखरच अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे का? ‘मधुमेही’ आणि ‘कावीळग्रस्त’ परस्परांवर तुटून पडत आहेत ते ह्याच मुद्द्यावर. सत्ताधारी आणि लेखक-कलावंत ह्यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, नगरमधील विभागीय साहित्य संमेलनात (नोव्हेंबर २०१७) रंगनाथ पठारे व रामदास फुटाणे ह्यांनी भाष्य केले ते सत्ताधाऱ्यांना सुनावणारे. त्याचे विश्लेषण... ---------------------- नरेंद्र मोदी  ह्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर येऊन साडेतीन वर्षं झाली आहेत. ह्या सरकारला जनतेकडून पुढचा कौल मिळविण्यासाठी अजून दीड वर्षाचा काळ बाकी आहे. म्हणजे २०१९. लोकसभेच्या २०१४च्या निवडणुकीआधीच, भाजपनं नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं, तेव्हापासून (म्हणजे गेली जवळपास साडेचार-पाच वर्षं) देशाचं राजकारण बहुतांशी याच नावाभोवती फिरत राहिलं आहे - आत्यंतिक लोभ आणि पराकोटीचा द्वेष, ह्या ध्रुवांमध्ये आणि तरीही मध्यबिंदूजवळ कधी न थबकलेलं. मधुमेही ‘ भक्त ’ आणि कावीळग्रस्त ‘ द्वेष्टे ’ ह्या सरकारबद्दल आणि त्याच्या नेतृत्वाबद्दल टोकाची मतं व्यक्त होत आहेत. मधुमेही ‘ भक्त ’ ...

एका लेखकाची ‘भेट’

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या ‘ ग्रंथ तुमच्या दारी ’ उपक्रमाचा मुक्काम गेल्या शुक्रवारी ( म्हणजे ८ सप्टेंबर रोजी) नगरमध्ये होता. एक दिवसाचा उपक्रम – ‘ पुस्तक घ्यावे ! पुस्तक द्यावे !!’ म्हणजे आपल्या संग्रहातली सुस्थितीतील पुस्तके द्यायची आणि तिथे उपलब्ध असलेल्यांपैकी आपल्याला आवडणारी, न वाचलेली, वाचावी वाटणारी पुस्तके त्या बदल्यात आणायची. अर्थात, या उपक्रमासाठी काही अटी व नियम लागू होत्याच. उपक्रमाची माहिती ज्या दिवशी समजली, त्याच दिवशी तिथं जाण्याचं ठरवलं. कारण एकच - घरात खूप पुस्तकं झाली आहेत. अडगळ म्हणावीत एवढी. अडगळच... पण समृद्ध ! तर या समृद्ध अडगळीतली थोडी-फार तरी निकाली काढायला हवी. इतर मंडळी तरी वाचतील ती. निघण्याच्या आधी पुस्तकं काढण्यासाठी म्हणून बसलो आणि अर्ध्या तासात जेमतेम आठ पुस्तकं निवडता आली. त्यातली चार माझ्या काहीच उपयोगाची नव्हती. बाकीची चार थोड्या जड हातांनीच उचलली. उपक्रमस्थळी पोहोचल्यावर आयोजकांनी बरोब्बर ‘ मला नको असलेली ’ पुस्तकं नाकारली. ‘ या बदल्यात मला पुस्तकं नकोत. ही कुणाला आवडली, तर घेऊन जाऊ द्यात, ’ हे माझं म्हणणंही त्यांनी नम्रपणे...

स्वप्न इंग्रजीत, अडचण मराठीत!

नांदेडला झालेल्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अभिनेत्री काजोल आमंत्रित होती. तिला मग   ‘ दोन शब्द ’  बोलण्याची विनंती झाली. तिच्या मराठीपणाचा आणि मराठी कुळाचा अभिमानाने उल्लेख करण्यात आला. काजोल बोलायला उठली आणि मराठीत बोलताना गडबडू लागली. तिनं त्याच गडबडीत अक्षरशः दोन शब्द संपवले. तिला सावरून घेताना लफ्फेदार साडीतील सूत्रसंचालिका तेव्हा म्हणाली होती , ‘ काजोलचा की नै ,  मराठीचा थोडा प्रॉब्लेम आहे! ’ नेमका हाच प्रॉब्लेम आमच्या अथर्वचा होता. फक्त भाषा बदलती. त्याला इंग्रजीची अडचण होती. आईचा आग्रह असतानाही अथर्वच्या बाबांनी त्याला जाणीवपूर्वक मराठी शाळेत घातलं होतं. पहिलीपासून इंग्रजी असूनही अथर्वला त्यात गती नव्हती.   ‘ रेन रेन गो अवे ’  आणि   ‘ हम्प्टी डम्प्टी ’  याच्या पलीकडे त्याची इंग्रजीची गाडी पुढं सरकत नव्हती. एकदा तर त्यानं आईला लाज आणली. दुसरीतल्या अथर्वचं मैत्रिणींपुढं कौतुक करताना ती म्हणाली होती , ‘‘ आमचा अथ्थू एका दमात ए टू झेड आणि वन टू हंड्रेड म्हणतो. ’’  मग तिनं त्याच कौतुकभरल्या नजरेनं अथर्वला खुणावलं हो...

... त्याचंच तर टेन्शन!

विकासला गेल्या रविवारी तसा थोडा उशीरच झाला. ठरलेल्या हॉटेलात गेला ,  थोडं इकडं-तिकडं पाहिलं आणि एका कोपऱ्यात अजय दिसला. कुठे तरी शून्यात बघत असल्यासारखा. त्याला वाटलं आपली वाट बघून कंटाळलेला दिसतोय. व्यंग्यचित्र किमया : कृत्रिम बुद्धिमत्ता (A. I.) ------------ भरलेली टेबलं आणि बशा घेऊन फिरणाऱ्या वेटरना चुकवत विकास टेबलाजवळ गेला. तो खुर्चीत बसला ,  तरी अजयचं लक्ष काही गेलं नाही. तो आपला भकास चेहऱ्यानं कुठं तरी नजर लावून बसलेला. चुटक्या वाजवत विकासनं त्याची तंद्री मोडली.  ‘‘ कसल्या विचारात आहेस रे बाबा ?  मी येऊन बसलो ,  तरी तुझं लक्ष नाही... ’’ अजयनं विकासकडं पाहिलं ,  पण काही बोलला नाही. त्या ऐवजी त्यानं एक सुस्कारा टाकला. विकास चमकला.  ‘‘ काय झालं रे ?  कसलं टेन्शन आहे ?  एकदम गप्प गप्प.. ?’’ टेबलावरचा पाण्याचा ग्लास उचलून अजयनं एका दमात रिकामा केला. म्हणाला , ‘‘ तसं म्हणशील तर टेन्शन नाही काही. पण आहे थोडंसं... ’’ विकासच्या तोंडावरचं प्रश्नचिन्ह ओळखून आणि ते तोंडातून बाहेर पडायच्या आधीच त्याला हातानं  ' थांब ,  ...

संख्या अल्प नि कर्तृत्व अफाट असलेला पारशी समाज

कुठल्या निमित्तानं कुठून कुठं जाता येतं, याची कल्पना आज आली. निमित्त फेसबुकचं. निमित्त ‘ पतेती ’ चं... अर्थातच पारशी नववर्षदिनाचं. निमित्त झालं फेसबुकवरील एका टिपणाचं. निमित्त दिलं प्रदीप रस्से यांनी... जळगावकर रस्से यांनी आपल्या पारशी मित्राला पतेतीच्या शुभेच्छा देण्यासाठी फेसबुकवर छोटं टिपण लिहिलं. त्यात त्यांचा लाडका बेहेराम काँट्रॅक्टर डोकावून गेलाच... तर त्यांचा तो छोटा परिच्छेद आवडून गेला. त्यावर प्रतिक्रिया लिहायला बसलो आणि हा लेख प्रसवता झालो. म्हणजे हा प्रवास ‘ लाईक ’ च्या अंगठ्यापासून, प्रतिक्रियेपासून स्वैर लेख लिहिण्यापर्यंत. हा प्रवास ‘ फेसबुक ’ पासून ‘ खिडकी ’ पर्यंत ! विचार करायला लागल्यावर लक्षात आलं, आपल्याला पारशी समाजाबद्दल तशी फारशी काही माहिती नाही. त्यांच्याबद्दल फार काही वाचलंही नाही. ‘ पारशी ’ म्हटल्यावर सर्वांत आधी आठवतात ‘ टाटा. ’ शाळेच्या इतिहासात शिकलेले दादाभाई नवरोजी नंतर. पारशी माणसं भेटली नाहीत ; भेटली असली तरी आठवणीत नाहीत. पण पु. ल. देशपांडे यांनी रेखाटलेली ` वल्ली ` आणि असंच काहीबाही वाचून त्यांच्याबद्दल आपुलकी मात्र वाटू लागली. ` अंतर्नाद...
html