मुख्य सामग्रीवर वगळा

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

भूषण, दूषण आणि प्रदूषण

गंजल्या जरी । काढा तलवारी ।
आम्ही ‘वार’करी । आठवा थोडे ।।

 
करा आता जोर । लावा तयां धार ।
कशाचा विसर । पडलासे तुम्हा ।।

 
जातीची ढाल । द्वेषाची मशाल ।
पेटवा खुशाल । लागो द्यात आग ।।

थोडी फुंक मारा । फुलेल निखारा ।
आगडोंब सारा । मग उसळेल ।।

करू या कहर । कालवू जहर ।
हाच तो प्रहर । साधण्या संधी ।।

चंदनगंधाची सोड । जुनी ती खोड ।
उगाळ खोड । आता घाणेरीचे ।।

तयांचा उद्धार । करू या चित्कार ।
विषाचे फुत्कार । वळवळीत ।।

शेलके वेचावे । हवे ते बोलावे ।
घ्या हे पुरावे । करावे जाहीर ।।

तो(ह)फा जितेंद्रीय । प्रेक्षक देवेंद्रीय ।
निर्माता राजकीय । ‘दिलीपकुमार’ ।।

इतिहासे कोंदणे । हवे ते गोंदणे ।
शरदाचे चांदणे । दाविते मार्ग ।।
.
.
.
खेळ प्रचलित । मने कलुषित ।
हवा प्रदूषित । होऊ दे की ।।

असे असे घडे । कोण कुठे पडे ।
पापाचिये घडे । ओसंडिले ।।

देण्यात दूषण । कोणाला भूषण ।
वास्तव हे भीषण । आज-कालचे ।।
-------------------------------------
© आम आदमी
-------------------------------------
#Maharashtra_Bhooshan #award #ShivShahir #cast_politics #history

टिप्पण्या

  1. शरदाच्या चांदण्यातून मार्ग दाखवणा-या आजच्या 'खिडकी'ने नेमका वेळ साधला आहे असे वाटून गेले. असे पद्यमय गद्य वाचायला आम्ही तयार आहोत.
    मंगेश नाबर

    उत्तर द्याहटवा
  2. Dear Satish,

    I liked the entire blog and your concepts as well. Keep me posted for further updated on your blog.

    - Devendra Ramesh Rakshe

    उत्तर द्याहटवा
  3. सतीशराव,
    'खिडकी'तला मजकूर वाचला - आवडला, मनाला भिडला.
    हे तर उत्तम 'काव्य' आहे - ओवीच्या साच्यातील. त्यास गद्य का म्हणता हे कळले नाही. (अर्थात हे पद्य नाही, कारण पद्य हे गेय असावे असाही इशारा त्यात असतो, जो इथे नाही.)
    - केशवचैतन्य कुंटे

    उत्तर द्याहटवा
  4. आपले गद्यकाव्य वाचले. खरेच छान आहे.
    लेखणी बंद ठेवणे खरेच कठीण असते. अशीच लेखणीरूपी तलवार चालवीत राहावे.
    - प्रियंवदा कोल्हटकर

    उत्तर द्याहटवा
  5. प्रिय सतीश,
    अप्रतिम आणि अर्थवाही कविता; अगदी केशवकुमार यांच्या पंगतीत सहज बसेल अशी झाली आहे.
    - अरविंद व्यं. गोखले

    उत्तर द्याहटवा
  6. देण्यात दूषण । कोणाला भूषण ।
    वास्तव हे भीषण । आज-कालचे ।।

    ही गोष्ट नेहमीच खरी असते. मस्तच !

    उत्तर द्याहटवा
  7. भूषण, दूषण आणि प्रदूषण - वास्तव पण कटू सत्य. समर्पक शब्दांत आणि भेदकपणे व्यक्त झाले आहे.
    - शेखर जोशी

    उत्तर द्याहटवा
  8. पद्यासारखे गद्य वाचले. फारच छान लिहिले आहे. हा वाद सध्या राजकारण्यांनी घेरलाय. घोटाळ्यांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा हा प्रयत्न आहे. दुर्दैवाने चौथा स्तंभही राजकारण्यांच्या हातात हात घालून चालतोय, याचे वैषम्य वाटते. सामान्य लोक काय जे मिळेल ते पाहतात, वाचतात आणि त्यावरून मत बनवितात. या गोष्टींचा मारच इतका भयानक आहे. आमची पिढी सारासार विचार करायचे विसरून गेलीय. सगळे रेडीमेड मिळतेय. अभ्यास कशाला करायचा? एवढे मोठे राजकीय नेते काय खोटे बोलत असतील का?
    - प्रशांत पिंपळनेरकर

    उत्तर द्याहटवा
  9. खूपच सुंदर!
    अत्यंत कमी शब्दांत, अर्थ व्यक्त करणारे. भूषण, दूषण, प्रदूषण... तीन शब्दांतच सर्व काही आले.
    - प्रसाद कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  10. सद्य परिस्थितीचे व भीषण वास्तवाचे समर्पक शब्दांत वर्णन. छान! पद्यमय गद्य आवडले.
    - मनीषा चपळगावकर

    उत्तर द्याहटवा
  11. ब्लॉग वाचला. तुमचं लिहिणं मार्मिक आहे. छान लिहिताय. शुभेच्छा!
    - पुंडलिक वझे

    उत्तर द्याहटवा
  12. सतीशराव,
    अशीच लेखनी छान चालवा, समाजातील सद्य विदारक स्थितीवर प्रकाश टाकुन समाजातील निष्क्रियता घालवा.
    छानच !!!

    उत्तर द्याहटवा
  13. सतीश दादा, अप्रतिम रचना,आजचे दाहक वास्तव यथार्थपणे,प्रवाही मांडले आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ---------- हा लढा केवळ एका अक्षराचा नाही. मराठीच्या अस्मितेचे अढळपद टिकवून ठेवण्याचा संघर्ष आहे.  'तिलक' किंवा 'जलगाव' ही मोडतोड थांबविण्यासाठी पुण्याच्या श्री. प्रकाश निर्मळ ह्यांनी केंद्रीय मंत्रालयांपर्यंत चिवट पाठपुरावा केला. केंद्रीय हिंदी संचालनालयाने अखेर विस्तारित वर्णावलीत 'ळ'  स्वीकारला. ऋग्वेदापासून ते आधुनिक उपबोलींपर्यंत ५० कोटी जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या 'ळ' अक्षराची ही रंजक भाषिक यात्रा. सोबत प्रकाश निर्मळ ह्यांची मुलाखत... ---------------- ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्...

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...
html