Wednesday 19 August 2015

भूषण, दूषण आणि प्रदूषण

गंजल्या जरी । काढा तलवारी ।
आम्ही वारकरी । आठवा थोडे ।।

 
करा आता जोर । लावा तयां धार ।
कशाचा विसर । पडलासे तुम्हा ।।

 
जातीची ढाल । द्वेषाची मशाल ।
पेटवा खुशाल । लागो द्यात आग ।।

थोडी फुंक मारा । फुलेल निखारा ।
आगडोंब सारा । मग उसळेल ।।

करू या कहर । कालवू जहर ।
हाच तो प्रहर । साधण्या संधी ।।

चंदनगंधाची सोड । जुनी ती खोड ।
उगाळ खोड । आता घाणेरीचे ।।

तयांचा उद्धार । करू या चित्कार ।
विषाचे फुत्कार । वळवळीत ।।

शेलके वेचावे । हवे ते बोलावे ।
घ्या हे पुरावे । करावे जाहीर ।।

तो(ह)फा जितेंद्रीय । प्रेक्षक देवेंद्रीय ।
निर्माता राजकीय । दिलीपकुमार।।

इतिहासे कोंदणे । हवे ते गोंदणे ।
शरदाचे चांदणे । दाविते मार्ग ।।
.
.
.
खेळ प्रचलित । मने कलुषित ।
हवा प्रदूषित । होऊ दे की ।।

असे असे घडे । कोण कुठे पडे ।
पापाचिये घडे । ओसंडिले ।।

देण्यात दूषण । कोणाला भूषण ।
वास्तव हे भीषण । आज-कालचे ।।
-------------------------------------
© आम आदमी
-------------------------------------
#Maharashtra_Bhooshan #award #ShivShahir #cast_politics #history

15 comments:

 1. शरदाच्या चांदण्यातून मार्ग दाखवणा-या आजच्या 'खिडकी'ने नेमका वेळ साधला आहे असे वाटून गेले. असे पद्यमय गद्य वाचायला आम्ही तयार आहोत.
  मंगेश नाबर

  ReplyDelete
 2. छानच. चपखल वर्णन.

  ReplyDelete
 3. Dear Satish,

  I liked the entire blog and your concepts as well. Keep me posted for further updated on your blog.

  - Devendra Ramesh Rakshe

  ReplyDelete
 4. सतीशराव,
  'खिडकी'तला मजकूर वाचला - आवडला, मनाला भिडला.
  हे तर उत्तम 'काव्य' आहे - ओवीच्या साच्यातील. त्यास गद्य का म्हणता हे कळले नाही. (अर्थात हे पद्य नाही, कारण पद्य हे गेय असावे असाही इशारा त्यात असतो, जो इथे नाही.)
  - केशवचैतन्य कुंटे

  ReplyDelete
 5. आपले गद्यकाव्य वाचले. खरेच छान आहे.
  लेखणी बंद ठेवणे खरेच कठीण असते. अशीच लेखणीरूपी तलवार चालवीत राहावे.
  - प्रियंवदा कोल्हटकर

  ReplyDelete
 6. प्रिय सतीश,
  अप्रतिम आणि अर्थवाही कविता; अगदी केशवकुमार यांच्या पंगतीत सहज बसेल अशी झाली आहे.
  - अरविंद व्यं. गोखले

  ReplyDelete
 7. देण्यात दूषण । कोणाला भूषण ।
  वास्तव हे भीषण । आज-कालचे ।।

  ही गोष्ट नेहमीच खरी असते. मस्तच !

  ReplyDelete
 8. भूषण, दूषण आणि प्रदूषण - वास्तव पण कटू सत्य. समर्पक शब्दांत आणि भेदकपणे व्यक्त झाले आहे.
  - शेखर जोशी

  ReplyDelete
 9. पद्यासारखे गद्य वाचले. फारच छान लिहिले आहे. हा वाद सध्या राजकारण्यांनी घेरलाय. घोटाळ्यांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा हा प्रयत्न आहे. दुर्दैवाने चौथा स्तंभही राजकारण्यांच्या हातात हात घालून चालतोय, याचे वैषम्य वाटते. सामान्य लोक काय जे मिळेल ते पाहतात, वाचतात आणि त्यावरून मत बनवितात. या गोष्टींचा मारच इतका भयानक आहे. आमची पिढी सारासार विचार करायचे विसरून गेलीय. सगळे रेडीमेड मिळतेय. अभ्यास कशाला करायचा? एवढे मोठे राजकीय नेते काय खोटे बोलत असतील का?
  - प्रशांत पिंपळनेरकर

  ReplyDelete
 10. खूपच सुंदर!
  अत्यंत कमी शब्दांत, अर्थ व्यक्त करणारे. भूषण, दूषण, प्रदूषण... तीन शब्दांतच सर्व काही आले.
  - प्रसाद कुलकर्णी

  ReplyDelete
 11. सद्य परिस्थितीचे व भीषण वास्तवाचे समर्पक शब्दांत वर्णन. छान! पद्यमय गद्य आवडले.
  - मनीषा चपळगावकर

  ReplyDelete
 12. ब्लॉग वाचला. तुमचं लिहिणं मार्मिक आहे. छान लिहिताय. शुभेच्छा!
  - पुंडलिक वझे

  ReplyDelete
 13. सतीशराव,
  अशीच लेखनी छान चालवा, समाजातील सद्य विदारक स्थितीवर प्रकाश टाकुन समाजातील निष्क्रियता घालवा.
  छानच !!!

  ReplyDelete
 14. सतीश दादा, अप्रतिम रचना,आजचे दाहक वास्तव यथार्थपणे,प्रवाही मांडले आहे.

  ReplyDelete
 15. सर, खूपच छान काव्य लिहिले आहे.

  ReplyDelete

एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...

  ‘आवाज’ आणि दिवाळी ह्यांचं जवळचं नातं आहे. हा फटाक्यांचा आवाज नाही. ‘आवाऽऽज कुणाऽऽचा?’, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘पाटकरांचा!’ हेच असणार!! ‘आवा...