भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...
(सौजन्य - 'इंडिया टुडे' / creativegaga.artstation.com ) --------------------------------------------- आदरणीय , प्रातःस्मरणीय आणि नित्य आमंत्रणीय प्रियांका नेहरू-गांधी-वद्रा , अर्थात ताईंच्या सेवेशी , काँग्रेसचा चार आण्यांचाच सभासद असलेल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याचा साष्टांग दंडवत! (आता देशाच्या राजकारणात काँग्रेसचा वाटा चार आण्यांचाच राहिलेला नाही , हे वेगळं!) बरं वाटतं म्हणून दंडवत लिहिलं. प्रसंग आलाय बाका , काय करील दिग्विजयकाका! लोटांगण घातलं तरी कमीच , अशी स्थिती सांप्रत काळी ओढवलीय. म्हणजे आपणच ओढवून घेतलीय. खरं तर तुम्हाला ‘ दीदी ’ च म्हणणार होतो. पण मग तुम्हाला आम्ही ‘ मां , माटी , मानुष ’ वाले वाटायचो. ‘ वंगभंग ’ ऐवजी भ्रुकुटीभंग व्हायचा! ‘ अम्मा ’ म्हणावंही वाटलं मनात. लगेच लक्षात आलं की , तो (अखिल भारतीय अण्णा) द्राविडी प्राणायम होईल. आणि सलमान खुर्शीदसाहेबांना ‘ म्याडम म्हणजे राष्ट्रमाता ’ असं जाहीर करून टाकलंय ना! तो ‘ सोनियाचा दिनु ’ जंता अजून विसरलेली नाही. (म्हणून तर हे दिवस आले नशिबी.) पत्रास कारण... एक काय लय आहेत. (आपल्या पार्टीला लयच सा...