भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...
‘मराठी मुमूर्षू झाली आहे’,
ह्या शतकापूर्वीच्या विधानाला
पाठिंबा देणाऱ्यांना शुभेच्छा!
‘मराठीला ह्या जन्मात मरण नाही’,
मनाशी असा ठाम विश्वास
बाळगणाऱ्यांना शुभेच्छा!
मराठी शिकून पैसे कमावणं,
जगणं कठीण आहे, असं
मानणाऱ्यांना शुभेच्छा!
तांत्रिक शब्दांना मराठी
प्रतिशब्द शोधू पाहणाऱ्यांची
टिंगल उडवणाऱ्यांना शुभेच्छा!
मराठीच्या कमी होणाऱ्या
वापराबद्दल इतर भाषांना सदैव
दूषणं देणाऱ्यांना शुभेच्छा!
मराठीबद्दल न्यूनगंड बाळगून
सार्वजनिक जीवनात परभाषा
बोलणाऱ्या मंडळींना शुभेच्छा!
मराठीबद्दलचा अहंगंड कुरवाळत
परभाषांच्या आक्रमणाबद्दल
तलवार उपसणाऱ्यांना शुभेच्छा!
पोरा-नातवंडांना इंग्रजी माध्यमातून
शिकवून मातृभाषेतील शिक्षणाचं
महत्त्व तावानं सांगणाऱ्यांना शुभेच्छा!
मराठीच्या दुरवस्थेचं खापर
इंग्रजी, हिंदी भाषांवर
फोडणाऱ्यांना शुभेच्छा!
दिनाच्या मुहूर्तावर आठवण
येऊन माय-मराठीची
काळजी करणाऱ्यांना शुभेच्छा!
मुहूर्तावर विनोद करण्यासाठी
आंग्लाळलेले परिच्छेद लिहिणाऱ्या
‘विनोदवीरां’ना शुभेच्छा!
एकादशी, संकष्टी, पांढरा बुधवार
ह्याप्रमाणे मराठी गौरवदिनाच्या
शुभेच्छा देणाऱ्यांना शुभेच्छा!
व्हॉट्सॲप, फेसबुकवर
शुभेच्छांचे वेचक संदेश
पुढाळणाऱ्यांना शुभेच्छा!
ज्ञानोबा, तुकोबा, रामदास,
राजवाडे, कुसुमाग्रज आदींना
वेठीस धरणाऱ्यांना शुभेच्छा!
परप्रांतांतून, परदेशांतून
इथं येऊन प्रेमापोटी
मराठी शिकणाऱ्यांना शुभेच्छा!
ह्यातलं काहीच माहिती नसताना
रोज मराठी बोलून-वाचून-ऐकून
भाषा वाढविणाऱ्यांनाच शुभेच्छा!
....
मराठी ‘आम आदमी’
................


आणि मराठी मातृभाषा नसताना देखील मराठी वर प्रेम करणा-या पर भाषिकांना सस्नेह शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवामाय मराठी म्हणजे *पसायदान*
उत्तर द्याहटवामाय मराठी म्हणजे सर्व भाषेची….
*छत्रपती*
या माय मराठीचाही स्वत: बरोबर राज्याभिषेक करणारे शिव छत्रपतीच.
श्रीराम वांढरे.
खूप सुंदर कविता. करावं तितकं कौतुक कमीच आहे.
उत्तर द्याहटवा- कनिफ बांगर, ठाणे
सुंदर!!!
उत्तर द्याहटवा- स्वाती लोंढे
कुलकर्णीसाहेब, सलाम, सलाम, सलाम, सलाम..!
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌
- विकास पटवर्धन, नगर
‘खिडकी’तून खूप दूरचं दिसायला लागलेलं आहे. ‘खिडकी’ला मनापासून शुभेच्छा!
उत्तर द्याहटवा- कौतिकराव ठाले पाटील, औरंगाबाद