भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...
गंजल्या जरी । काढा तलवारी । आम्ही ‘ वार ’ करी । आठवा थोडे ।। करा आता जोर । लावा तयां धार । कशाचा विसर । पडलासे तुम्हा ।। जातीची ढाल । द्वेषाची मशाल । पेटवा खुशाल । लागो द्यात आग ।। थोडी फुंक मारा । फुलेल निखारा । आगडोंब सारा । मग उसळेल ।। करू या कहर । कालवू जहर । हाच तो प्रहर । साधण्या संधी ।। चंदनगंधाची सोड । जुनी ती खोड । उगाळ खोड । आता घाणेरीचे ।। तयांचा उद्धार । करू या चित्कार । विषाचे फुत्कार । वळवळीत ।। शेलके वेचावे । हवे ते बोलावे । घ्या हे पुरावे । करावे जाहीर ।। तो(ह)फा जितेंद्रीय । प्रेक्षक देवेंद्रीय । निर्माता राजकीय । ‘ दिलीपकुमार ’ ।। इतिहासे कोंदणे । हवे ते गोंदणे । शरदाचे चांदणे । दाविते मार्ग ।। . . . खेळ प्रचलित । मने कलुषित । हवा प्रदूषित । होऊ दे की ।। असे असे घडे । कोण कुठे पडे । पापाचिये घडे । ओसंडिले ।। देण्यात दूषण । कोणाला भूषण । वास्तव हे भीषण । आज-कालचे ।। ------------------------------------- © आम आदमी ------------------------------------- #Maharashtra_Bhooshan #award #ShivShahir #cast_pol...