अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...
‘ अहमदनगर ’ असं कागदोपत्री नाव असलेलं आणि साऱ्यांच्या बोलण्या-लिहिण्यात कायम ‘ नगर ’ असाच उल्लेख येत राहिलेल्या ह्या शहराचं वयोमान पाचशेहून अधिक आहे. त्याचा स्थापनादिन २८ मे . गेल्या अडीच दशकांपासून तो साजरा होतो. त्याच आठवणी, तेच कढ, तीच महता आणि तीच गाथा... उत्सवी स्थापनादिनापलीकडे कधीच काही होत नाही. ह्या शहराबद्दलची आपुलकी व्यक्त करणारी ही कविता. अडीच वर्षांपूर्वी केलेली... आणि वर्तमान पाहता भविष्यातही तशीच लागू राहील, असंच खंतावून म्हणावंसं वाटतं. -------------- भो , ऐतिहासिक नगरा , उपेक्षेचे वारे सोसत , परी ना कण्हत , ना कुथत , संथ गतीने सुरूच आहे तुझी वाटचाल , अखंडित पारतंत्र्याच्या सोसून अनेक ‘ शाही ’ अनुभवतोयस सध्या लोकशाही , पण तुझ्या गौरवाच्या आणि कुचेष्टेच्या लिखाणाची अजूनही आहे ओली शाई पाचशतकी वयाचा तुझ्या उल्लेख होतो वारंवार , पण बा नगरा , नाहीत दिसत वार्धक्याच्या काहीबाही खुणा तुझ्या अंगावर... हां , दिसताहेत सुरकुत्या क...