मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

शबरीमला ते शिंगणापूर...

देव शुद्ध झाला !! आणि हो, (पुन्हा) पवित्रही झाला !! नेहमी स्वतःपुढे ‘ पुरोगामी ’ असं विशेषण आग्रहानं लावून घेणाऱ्या, ‘ डाव्या विचारांचा (एके काळचा) बालेकिल्ला ’ मानल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातली गोष्ट आहे ही. ‘ जो जे वांछिल तो ते लाहो। प्राणिजात॥ ’ असे पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणाऱ्या नेवासे तालुक्यातल्या शनिशिंगणापूरची चित्तचक्षुचमत्कारिक गोष्ट सांगतोय ही. देवाचं पावित्र्य शनिवारी (२८ नोव्हेंबर) भंग पावलं होतं. समस्त गावकऱ्यांनी रविवारी (२९ नोव्हेंबर) देवाला पुन्हा ते पावित्र्य मिळवून दिलं. या दोन्हींचंही कारण ‘ ती ’ होती. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास एक मुलगी किंवा तरुणी शनिशिंगणापुरातील मंदिरात होती. अंगात पँट आणि शर्ट. केसाचा एक शेपटा. गळ्यात उपरण्यासारखी घेतलेली ओढणी. तिने पादत्राणे चौथऱ्याखाली सोडली. पायात मोजे तसेच ठेवत चौथऱ्यावर चढली. तेलाने अभिषेक केला आणि लगेच खाली परतली. हा सारा प्रसंग अवघ्या  २ ० - २ ५  सेकंदांचा. (पाहा : शनिशिंगणापूर देवस्थानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील ही चित्रफीत. http://marathi.eenad...
html