मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

अचाट आणि अफाट!

' ट्टॉक ' करायला शिकवलं , फुरसुंगीच्या बनेश ऊर्फ फास्टर फेणेनं. तो भा. रा. भागवतांचा मानसपुत्र. ताम्हनकरांचा ' गोट्या ' आणि ' चिंगी ' तेव्हा जुने झाले होते. आणि दिलीप प्रभावळकर यांच्या ' बोक्या सातबंडे ' चा जन्मच व्हायचा होता. फास्टर फेणेच्या लीला जेव्हा पुस्तकं वाचायला भाग पाडत होत्या , त्याच काळात आणखी एक पुस्तक हाती आलं. एकदम भन्नाट! ' तिरसिंगराव ' असं त्या पुस्तकाचं नाव. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी ते नव्या अवतारात भेटले. ' पुन्हा तिरसिंगराव. ' इथेही त्यांचे पराक्रम होतेच. या मराठमोळ्या पेहेलवानाच्या कथा ' कुमार ' मध्ये प्रसिद्ध होत होत्या. अचाट आणि अफाट अशाच. त्या काही तेव्हा वाचण्यात आल्या नाहीत. पुस्तक बनल्यावरच त्या कथा वाचल्या. हिंदकेसरी तिरसिंगराव. जगप्रसिद्ध मल्ल. अस्सल कोल्हापुरी भाषेत बोलणारा , आकडी दुधाचा कॅनच तोंडाला लावणारा , अफाट व्यायाम आणि अचाट पराक्रम करणारा पेहेलवान. गरिबांना मदत करणारा आणि गुंडांना बुक्कीत लोळवणारा पेहेलवान.   चिनी हेरांच्या कारवाया उधळून लावणारा , सिनेमात काम करणारा , विमान अ...
html