मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

चांगभले...तुमच्याचमुळे

वारं ते सुटलंय सुसाट येणारे पुन्हा त शी च लाट ? लागणारे  का पुरती वाट ? झिंगझिंगाट... आता पुरती हो अडचण म्हणूनच तुमची आठवण पदोपद आणि क्षणोक्षण नामसंकीर्तन तुमचे... नवे जेव्हा केव्हा काही घडे बडवू जुने नगारे - चौघडे भूतकाळाचीच ही देण गडे जयजयकार तुमचा... ये देशी तुम्ही आणिले विज्ञान कसले कसले भारी तंत्रज्ञान अन्यथा सारा अंधारी अज्ञान तुम्हां पूर्वी नि सांप्रत... तुम्ही स्थापिली आयआयटी तुमच्यामुळेच उभी अणुभट्टी फळे मिळती रसाळ गोमटी तुमच्याच कारणे... ' इस्रो ' तुमची स्वप्नपूर्ती दिल्लीमधील ' तीन मूर्ती ' देत राहिली सदा स्फूर्ती किती गावो कीर्ती... बांधला होता तुम्हीच चंग मंगलयान ते उडाले बूंग कौतुकात राही देश दंग तुम्हीच करवियले... लढविली होती तेव्हा युक्ती म्हणुनी आज दिसे महाशक्ती एवढ्या निमित्ते करितो भक्ती तुमची आणि तुमचीच... सीमेवरी खडे सज्ज सैन्य कधीचे हटले देशाचे दैन्य गाठीला बांधले गेले पुण्य कृतकृत्य वाटे... तुम्हीच एकमेव जंटलमन या देशीचे लास्ट इंग्लिशमन आता बहु ...

कृतार्थ शतकवीर बी. जे. खताळ पाटील

स्वातंत्र्यसैनिक व माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील ह्यांनी २०१९मध्ये  वयाचे शतक पूर्ण केले. त्याच्या एक वर्षे आधी, शंभराव्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने त्यांची मुलाखत घेतली होती. त्यांच्याशी झालेल्या काही भेटी, मुलाखत ह्यावर आधारित हा लेख -  निमित्त अर्थात त्यांच्या शतकपूर्तीचे. दादांचे त्यानंतर सहा महिन्यांनी (१६ सप्टेंबर २०१९) निधन झाले. संवादात त्यांनी जे काही सांगितले ते विचार, त्यांच्या आठवणी आजही तितक्याच ताज्या आणि प्रेरणादायी आहेत. ‘ जास्त जगणं म्हणजे पुण्याचं काम नाही. पापाचं काम आहे. नको ते ऐकावं लागतं हो. माझा मुलगा मला सांगतो, ‘ दादा, अहो मी म्हातारा झाला हो !’ बघा गंमत, मुलगा वडलांना सांगतो की, म्हातारा झालो... ’ ‘ मला म्हातारपणाची व्याख्या विचारतात. मी तरुणपणाची आणि म्हातारपणाचीही व्याख्या सांगतो - जे जातं आणि येत नाही, ते तारुण्य. आणि जे येतं पण कधीच जात नाही, ते म्हातारपण!' ...ही फटकेबाजी अलीकडेच केली स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री श्री. बी. जे. खताळ पाटील ह्यांनी. संगमनेरमध्ये. त्यांच्याच गावात. त्यांनी लिहिलेल्या ‘ माझे श...

रडीचा डाव... नियमानुसारच!

‘ इंडियन प्रीमियर लीग ’ च्या बाराव्या अध्यायाच्या तिसऱ्या दिवशीच सनसनाटी अनुभवायला मिळाली. उत्तुंग टोलेबाजी, दिमाखदार विजय किंवा धारदार गोलंदाजी ही काही त्या सनसनाटीची कारणे (किंवा लक्षणेही) नाहीत. त्यात नायक नव्हता. असलाच तर खलनायक होता. आणि तो ठरला, भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज, पंजाब किंग्ज एलेव्हनचा कर्णधार रविचंद्रन अश्विन. नायक ठरता ठरता राहिला राजस्तान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलर. तणतण करीत तंबूत परतताना तो सहानुभूती मिळवून गेला. जयपूरच्या मैदानावर राजस्तान रॉयल्सला पहिल्यांदाच पराभूत करण्याची कामगिरी पंजाबनं साधली. पण ही लढत त्यामुळं लक्षात राहणार नाही. ‘ युनिव्हर्स बॉस ’ ख्रिस गेल याने ४७ चेंडूंमध्ये ७९ धावा तडकावल्या. सामना त्यामुळे लक्षात राहणार नाही. बऱ्याच दिवसांनी सर्फराज खान चमकला. पण त्याचा हा डावही लक्षात राहणार नाही. चेंडू व्यवस्थित बॅटवर येऊ लागल्यामुळे सूर सापडलेल्या स्टिव्ह स्मिथचा के. एल. राहुलनं अफलातून झेल पकडला. यंदाच्या स्पर्धेतील तो महत्त्वाचा झेल होईल कदाचित. पण ही लढत त्यामुळेही लक्षात ठेवण्यासारखी झाली, असं म्हणता येणार नाही. बटलर धावबाद अश्विन. ...