शुक्रवार, २२ मे, २०१५

महेंद्रसिंह आणि माधवराव

मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना हरल्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी जे काही बोलला, त्याबद्दल त्याला दंड करण्यात आला.

काय म्हणाला होता धोनी? पराभवाची कारणमीमांसा करताना `स्मिथला बाद देण्याचा पंचाचा (चुकीचा) निर्णयही आम्हाला भोवला`, असं काहीसं तो म्हणाला होता. मलिंगाचा तो चेंडू लेग स्टंपाच्या बाहेर होता; अगदी 110 टक्के! तमाम प्रेक्षकांनी नंतर ते पाहिलंय.

म्हणजे खरं बोलल्याबद्दल धोनीला दंड झाला.

त्यावरून एक जुनी गोष्ट आठवली. उच्च न्यायालयानं मागे एकदा सांगितलं होतं - `सत्य हा बचाव होत नाही.` त्यावर मग माधव गडकरी यांनी बरंच काही लिहिलं होतं.

1 टिप्पणी:

  1. आपला ब्लॉग वाचला. थोडा उशीरच झाला. साहित्यविषयक चर्चा या ब्लॉगवरून व्हावी. नवे साहित्य प्रसिद्ध व्हावे. त्यासाठी शुभेच्छा!
    - नंदकुमार सुर्वे (संगमनेर)

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...