अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...
गोष्ट तशी फार जुनी नाही. नेमकं सांगायचं तर दोन वर्षं नि एक महिन्यापूर्वीची आहे आणि तीन दिवसांपूर्वीची आहे. म्हणजे 13 जून 2013 रोजीची आणि 15 जुलै 2015 रोजीची. गोष्ट एका पुस्तकाची आहे आणि त्यामुळे भेटलेल्या एका वेगळ्या माणसाची आहे. माझ्या मुलाचे मामा श्री. अशोक कानडे यांनी 13 जून 2013 रोजी माझ्या वडिलांना एक पुस्तक भेट दिलं. पुस्तकाचं नाव - "हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन'. लेखक - श्री. एम्.. अनुवादक - श्री. वि. पटवर्धन. आवृत्ती तिसरी. पाने - 362. किंमत 295 रुपये. या पुस्तकाचा विषय पूर्णपणे अध्यात्माचा. अर्थातच तो आपला नाही, असं समजून पुस्तक हातात घेतलं आणि ठेवून दिलं. अध्यात्म, योग, साधू, चमत्कार या विषयाची आवडच असावी लागती. वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी. मुलगा मला परवा परवापर्यंत "नास्तिक' म्हणत होता. आस्तिक आहोत की अज्ञेयवादी, याच्या उत्तराचा शोध माझ्यापुरता चालू आहे. "नास्तिक' म्हणवून घ्यायला आवडलं असतं; पण तेवढा मनाचा खंबीरपणा नाही अजून. तो येईल की नाही, हे सांगणं कठीण आहे. असो! वडिलांनी श्री. एम. यांचं आत्मकथन वाचून पूर्ण केलं. ए...