Wednesday, 8 July 2015

आनंद
मागच्या आठवड्यात एक दिवस (शोभत नसतानाही) टी-शर्ट घालून कार्यालयात गेलो. एका सहकाऱ्याने तो न्याहाळला आणि विचारलं, ``मुलाचा टी-शर्ट घातला काय?``
 
निषेधात्मक आणि नकारात्मक मान हलवून त्याला म्हणालो, ``नाही, नाही. माझाच आहे तो. खूप दिवसांनी घातलाय.``

``तुमच्या मुलाच्या अंगावर दोनदा पाहिला म्हणून म्हणालो.`` सहकारी जरा खालच्या आवाजात म्हणाला.

मग उत्तर दिलं, ``टी-शर्ट माझाच आहे. वापरत नव्हतो म्हणून त्याला दिला. आज सहज अडकवलाय.``

...बाकी जाऊ द्या. अशा निमित्तानं का होईना, `आपला मुलगा` यापेक्षा `त्याचा बाप`, अशी आपली ओळख होणं नाही म्हटलं तरी आनंदाचंच असतं की!

1 comment:

  1. आमच्या कोकणातील गावी माझ्यापेक्षा माझा मुलगा अधिक जात असतो त्यामुळे मी तेथे गेल्यावर माझी ओळख त्याचा बाप अशी करून दिली जाते. याचे मला काय वाटणार ? आनंद होतो. तसेच या लेखातील टी शर्ट वापरणा-या बापासारखं आहे.
    मंगेश नाबर

    ReplyDelete

'हिंडता फिरता' अध्यक्ष उदगीरला लाभता

  'करून दाखवले!', असं काही कौतिकराव ठाले पाटील ह्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पण एखादी गोष्ट बोलून दाखवल्यावर करून दाखवण्याचाच त्या...