संजीवला लहानपणापासूनच गाड्यांचं नि मोटारींचं वेड लागलेलं. त्याला
असलेल्या ढीगभर खेळण्यांमध्ये गाड्याच गाड्या होत्या. तरी त्याला प्रत्येक
वाढदिवसाला खेळण्यातली गाडीच हवी असायची. वाढत्या वयाबरोबर त्याचं हे वेड
वाढतच गेलं. बारावीला उत्तम गुण मिळाल्यावरही संजीवनं `ऑटोमोबाईल
एंजिनीअरिंग`लाच प्रवेश घ्यायचा हट्ट धरला. आई-बाबांनी किती तरी समजावलं
त्याला, पुढची सुंदर, सोनेरी स्वप्नं दाखवली. पण संजूबाबा काही बधला नाही
त्यांना.
उत्तम गुण मिळवून संजीव पदवीप्राप्त अभियंता झाला. शेवटच्या वर्षी `कॅम्पस इंटरव्ह्यू`मध्ये `फोक्सवॅगन`सारख्या बड्या कंपनीत त्याची यशस्वी मुलाखत झाली. बी. ई.चा निकाल लागला आणि त्याच दिवशी संजीवच्या घरी `फोक्सवॅगन`चं `ऑफर लेटर` येऊन पडलं. दुहेरी यशाचा आनंद साजरा करताना आई-बाबांनी मणभर पेढे वाटले.
रात्री निवांत गप्पा मारताना बाबांनी विचारलं, ``मग कधी जॉईन होतोयस तू `फोक्सवॅगन`मध्ये? आता जरा 10-15 दिवस मजा कर नि मग लाग नोकरीला.`` ``मी नाही त्यांची `ऑफर` स्वीकारणार,`` असं सांगत संजीवनं `मी नोकरीच करणार नाही, स्वतःचं गॅरेज सुरू करणारेय!`, असा बॉम्बगोळा टाकला.
आई-बाबांना वाटलं, पोराला भिकेचे डोहाळे लागलेत. चांगली रुबाबात अधिकाऱ्याची नोकरी करायची सोडून निळे कपडे घालून हात काळे करायची अवदसा कुठनं आठवली, असंही त्यांनी संतापानं विचारलं. मग संजीवनं त्यांचं मराठी माणूस, त्याची नोकरीतच रमण्याची लाचार वृत्ती, उद्योग, श्रमप्रतिष्ठा वगैरे वगैरे मुद्द्यांवर तासभर लेक्चर घेतलं. ते त्यांनी ऐकून घेतलं निमूट.
स्वतःचं गॅरेज सुरू करण्याआधी संजीवला दोन-एक वर्षं एखाद्या चांगल्या गॅरेजमध्ये काम करून अनुभव घ्यायचा होता. मग इथं बाबाच कामी आले. त्यांनी जुन्या मित्राला गाठलं. त्याला बाबापुता करून आपल्या पोराला नोकरीला ठेवून घे, असं सांगितलं. त्या पोटी महिन्याला दोन-तीन हजार रुपये देण्याची तयारीही दाखविली. पण मित्राचा प्रश्न पैशाचा नव्हताच. एवढं शिकलेला एंजिनीअर आपल्या गॅरेजमध्ये काम करणार याचं दडपण त्याला वाटत होतं.
गॅरेजमध्ये रुजू झाल्यावर संजीवनं पहिले दोन दिवस सगळं समजून घेतलं. तिसऱ्या दिवशी `फोक्सवॅगन`ची भली थोरली मोटर गॅरेजसमोर उभी राहिली. संजीवसारखा उमदा, हुशार एंजिनीअर आपल्याकडे आहे आता, हे माहीत असलेल्या गॅरेजमालकानं काम स्वीकारलं आणि त्याच्यावर टाकली की जबाबदारी.
संजूनं मोठ्या खुशीत काम सुरू केलं. कोणाचीही मदत न घेता पाच तास तो खपला. सगळं काम संपवून काळे पडलेले, ग्रीसाळलेले हात धुवून, चेहरा स्वच्छ करून, शर्ट बदलून तो बाहेर आला. आपण गाडीचं काम एकदम टकाटक केलंय, असा विश्वास त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. तेवढ्यात गाडीचा मालक आलाच.
मोटारीचं काम एका दिवसात होईल, याची खात्री मालकाला नव्हती. संजीव म्हणाला, ``एका दिवसात? अहो, पाच तासांत केलं सगळं. एकदम ओके डन!``
मालक मोटारीजवळ गेला. त्यानं बारकाईनं पाहिलं. मग त्याच्या चेहऱ्यावर हळुहळू आठ्या उमटू लागल्या. संजीवनं विचारलं, ``काय झालं? गाडी एकदम टकाटक केलीय तुमची!``
त्याला चालकाच्या बाजूला नेत मोटरमालक म्हणाला, ``सगळं काम झालं म्हणताय; मग हे इथं पाच-सहा पोचे पडलेले तसेच कसे? हा इथला रंगाचा टवका उडालाय, तोही पाहिला नाही तुम्ही. आणि हे इथं कसल्या रंगाचं ठिगळ लावलंय हो? आरसाही तसाच खिळखिळा आहे. हँडल नीट लागतच नाहीये आणि खिडकीची काचही अडकतेय.``
त्याच्याकडं आश्चर्यचकित होऊन आणि आपल्यावर प्रचंड अन्याय होतोय, असा भाव चेहऱ्यावर आणून संजीव म्हणाला, ``अहो महाराज! ही सगळी कामं मी त्या पलीकडच्या बाजूनं कधीची केलीत की. बघा जरा नीट, डोळे उघडून!``
-----------------------
(पूर्वप्रसिद्धी ः `फेसबुक`च्या भिंतीवर 25 सप्टेंबर 2014)

छान ब्लॉग आहे.
उत्तर द्याहटवा