रविवार, ७ जून, २०१५

दोन मिनिटांचे वादळ

जे जे वाटे रसनेला भले
ते ते नसे प्रकृतीला चांगले
...असा एक साधा नियम आहे. पण तो समजून घेण्यात, त्याचे पालन करण्यात आपण सारे 'सुशिक्षित' कमी पडतो, असे अनेक वर्षापासून दिसते आहे.

आता 'मॅगी'च्या बातम्या येऊ लागल्यावर 'अरे बाप रे!', 'आई शप्पथ', 'भीषण' असे साश्चर्य वैफल्ययुक्त उद्गार काढण्याची स्पर्धा लागली आहे. त्यावरच्या विनोदांची `त्सुनामी` `सोशल मीडिया`तून आली आहे. खाणारेच लिहिणारे बनले आहेत.

एक दशकापूर्वी 'कोक'बाबत असेच घडले होते.

कृत्रिम शीतपेये, उठवळ बाजारू खाद्यपदार्थ याबद्दलचे प्रेम थोडक्यात आवरते घ्या, असे चांगले डॉक्टर, आहारतज्ज्ञ सारखं सांगत आहेत. पण चकचकीत जाहिरातींनी आपलं शिक्षण, समज कुचकामी ठरवली.

दोन मिनिटांत काही तरी वादळी करायचंय ना..?
भोगा फळं, मोजा किंमत!!!

२ टिप्पण्या:

  1. बातम्यातून मॅगी एवढी गाजतेय तेव्हा तुमची टिपणी कशी आली नाही याचे आश्चर्य करत होतो पण आता ती वाचून थोडे बरे वाटले. आमच्या मनातले लिहिलेत !
    मंगेश नाबर

    उत्तर द्याहटवा
  2. बायकोच्या विरोधामुळे जास्त खाता आली नाही.. ती माहेरी गेल्यावर काही वेळा खाल्ली असेल .. पण आता तीच बरोबर होती, हे कळाले ..!

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...