Thursday 25 June 2015

पत्रिका पाहून, कुंडली मांडून
पुढे छत्तीसच्या आकड्यासाठी
36 गुण `जुळवून`
कांदेपोहे खाऊन,
`बीएस्सी झालीस मुली,
पण मॅट्रिक पास आहेस ना?`
असे प्रश्न विचारून, चालायला लावून,
हुंडा उकळून, पाय धुवून घेऊन,
वाजतगाजत लग्न करून
बायको घरी आणा
किंवा
`लिव्ह-इन रीलेशनशिप`मध्ये
मनासारखी जोडीदारीण मिळवा
.
.
.
मुलाच्या वडिलांचा
बिनसाखरेचा आणि
मुलाच्या आईचा
दोन चमचे साखरेचा
चहा मुलीनंच करायचा असतो.
तो आदरानं त्यांना द्यायचा असतो.
आणि हो कप-बशा व्यवस्थित नेताना
ओढणी वगैरे व्यवस्थित घेऊन
आपला सुशीलपणा, सौजन्य, नम्रपणा
सिद्ध करायचा असतोच असतो!


त्याच्याकडच्यांना जिंकायचं असतं ना...

पटत नाही का? मग ही जाहिरात पाहा

https://www.youtube.com/watch?v=7pOFqpZAKds

No comments:

Post a Comment

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...