पेनल्टी कॉर्नर आणि गोल. पहिला गोल केल्याचा आनंद उपकर्णधार अमित रोहिदासच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो आहे. (छायाचित्र सौजन्य - https://www.fih.hockey) खरोखर आहे की नाही, माहीत नाही; पण बहुसंख्य भारतीयांसाठी ‘आपला राष्ट्रीय खेळ’ अशीच हॉकीची ओळख आहे. त्याच खेळाच्या विश्वचषक स्पर्धेस ओडिशामध्ये सुरुवात झाली आहे. पाच वर्षांच्या खंडानंतर (धन्यवाद कोविड!) होणाऱ्या ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे ओडिशामध्ये होणारी ही सलग दुसरी स्पर्धा. स्पर्धेचं गुरुवारी उद्घाटन झालं आणि आजपासून लढतींना सुरुवात झाली. ‘अ’ आणि ‘ड’ गटातील प्रत्येकी दोन सामने आज झाले. दोन सामने मोठ्या गोलफरकाचे आणि दोन गोलफलकावरून चुरशीचे झाल्याचे वाटावेत, असे. गंमतीची गोष्ट म्हणजे चारही सामन्यांतील विजयी संघांनी प्रतिस्पर्ध्यांना आपल्याविरुद्ध गोल करण्याची संधी दिली नाही. ‘ड’ गटात यजमानांनी विजयी सलामी दिली. दिवसातला हा शेवटचा सामना. ऑलिंपिकमधलं पदक आपण दीर्घ काळानंतर टोक्योमध्ये जिंकलं आणि हॉकी पुन्हा एकदा आकर्षणाचा विषय झाली. राऊरकेला इथल्या बिरसा मुंडा क्रीडागारात भारतीय संघानं अपेक्षांना तडा दिला नाही. एरवी सातत्यान...
कठीण भलतेच लिहिणे, त्याहून कठीण बंद लेखणी करणे...