अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...
कु ठल्याही सामाजिक माध्यमातलं लिखाण, व्यक्त झालेलं मत-विचार ह्याकडे कसं पाहावं ? त्यावरच्या वादविवादात किती टोकाची भूमिका घेत सहभागी व्हावं ? घटकाभरची, फावल्या वेळेतली करमणूक म्हणून पाहायचं की त्याचा गांभीर्यानं विचार करायचा ? फेसबुकवरची एक पोस्ट. आठवड्यापूर्वीची. भरपूर वाचली गेली आणि तिची जोरदार चर्चा झाली. हे टिपण वाचल्याची पावती १००३ जणांनी दिलेली. त्यापैकी ६०३ जणांनी हसरी स्मायली टाकलेली, बदाम टाकणारे १२ आणि लाईकचा अंगठा दाखविणारे ३७३. हा मजकूर न आवडल्याने रागावले चौघे आणि दुःखी झालेले तिघे. अर्थात ह्या साऱ्या भावना शब्दांकित नव्हे, तर इमोजीच्या रूपाने चिन्हांकित झालेल्या. शब्दाने व्यक्त झालेले वाचक आहेत ५८८ आणि हे टिपण १४६ वाचकांनी आपल्या भिंतीवर सामायिक केलेले. वरच्याच टिपणाशी संबंधित दुसरी पोस्ट त्यानंतर तीन दिवसांनी फेसबुकवर अवतरलेली. तिच्याबद्दल पावती देणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी. म्हणजे ३६६ - त्यात हसऱ्या स्मायली ११८, ' आवडलं बुवा ' असं बदामाच्या रूपाने सांगणारे सहा, अंगठा दाखविणारे २३८ वाचक. ह्या टिपणामुळे रागावलेल्यांची आणि वाईट वाटलेल्यांची संख्या...