सरत्या वर्षाला निरोप दिला आणि नव्या वर्षाचं स्वागत केलं ते प्रवासातच. दोन दिवस तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतो. संकल्प थोरात याच्या आंतरविद्यापीठ सायकलिंग स्पर्धेनिमित्त बिकानेरला जाणं झालं. तिथल्या तीन दिवसांच्या मुक्कामानंतर परतताना पुष्कर व अजमेर यांचा धावता दौरा केला.
या सहलीत खूप काही पाहणं झालं नाही, फार वेगवेगळ्या ठिकाणी चवीनं खाणं झालं नाही. असं असलं तरी मिळालेल्या वेळात या दोन्ही गोष्टी आवर्जून केल्या. आणखी एक गोष्ट म्हणजे फोटो. सोबत कॅमेरा नेला होता. शक्य होतं तिथं तिथं छायाचित्रं काढली. काही काही तर अगदी धावत्या मोटारीतून.
बिकानेरच्या जुनागढ़मधील राजसिंहासन. महिरप, त्यावरची कलाकुसर. पाहण्यासाठी वेळ अपुरा पडतो.
या सहलीत खूप काही पाहणं झालं नाही, फार वेगवेगळ्या ठिकाणी चवीनं खाणं झालं नाही. असं असलं तरी मिळालेल्या वेळात या दोन्ही गोष्टी आवर्जून केल्या. आणखी एक गोष्ट म्हणजे फोटो. सोबत कॅमेरा नेला होता. शक्य होतं तिथं तिथं छायाचित्रं काढली. काही काही तर अगदी धावत्या मोटारीतून.
कॉलेजमध्ये असताना प्रयोगपुस्तिकांची
(जर्नल) सजावट करण्यासाठी मला स्केच पेनांचा संच मिळाला होता. भौतिकशास्त्राच्या
पहिल्या प्रयोगाची नोंद करताना मी पाच-सहा वेगवेगळे रंग वापरून रंगपंचमीच खेळली
होती. आमचे अध्यापक अतिशय चांगले होते. त्यांनी मला बोलावून समजावलं - एक किंवा
दोनच रंग वापरावेत. म्हणजे मग चित्रविचित्र दिसत नाही.
कॅमेरा घेतल्यानंतर जेव्हा जेव्हा
प्रवास केला, तेव्हा तेव्हा त्याचा वापर मी पहिल्या वेळच्या स्केच पेनांसारखा
केला. वाटलं की, टिपलं छायाचित्र. त्यातले तांत्रिक तपशील अजून कळत नाहीत. तो
वापरणारा हातही तयार झाला नाही. नजरेला भावलेलं तसंच्या तसं छायाचित्रात सापडत
नाही. आपण क्लिक करत राहायचं, अपघातानं काही छायाचित्रं चांगली येतात, एवढं
बरीक कळलं आहे.
या सात दिवसांच्या सहलीत बरीच
छायाचित्रं काढली. त्यातली थोडी चांगली आली, काही बरी. चांगल्या छायाचित्रांचं श्रेय अर्थात त्या आधुनिक तंत्राच्या
कॅमेऱ्याला...
नव्या वर्षाचा पहिला दिवस.
सकाळी भरपूर थंडी होती. नयागांवमध्ये कडेकोट बंदोबस्तात दिसलेली ही मंडळी.
पाहुणे दूर देशीचे दिसती,
कुठून कुठे चालले असती?
असंच एक गाव. सकाळ संपून
दुपार चालू झालेली असली, तरी थंडी आहेच. म्हणून एवढा जामानिमा. गाडीतून कुणी तरी
कॅमेरा काढून बघतोय. थोड्या कुतुहलानं आणि स्मितहास्यानं मिळालेला
प्रतिसाद.
बिकानेरच्या जुनागढ़मधील राजसिंहासन. महिरप, त्यावरची कलाकुसर. पाहण्यासाठी वेळ अपुरा पडतो.
जुनागढ़मधलाच हा फूलमहाल. त्याच्या दरवाज्यावर सुरेख चित्र, महिरपीवर अप्रतिम कलाकुसर.
त्याच्या खाली आहे तो मेणा. राणीवंशासाठी. असे बरेच मेणे, पालख्या इथे आहेत.
पुष्कराच्या ब्रह्मदेव
मंदिराच्या बाहेर खूप दुकानं आहेत. मिठाया, महिलांना आवडणाऱ्या बांगड्या-पर्स,
खेळणी असं बरंच काही. हे एक दुकान तलवारींचं. पहिला फोटो काढताच तिथल्या तरुणानं 'नको बरं' असं नजरेनं दटावलं
आणि हातांनी खुणावलं.
हेच ते प्रसिद्ध पुष्करतीर्थ!
समोर पर्वतराजी, डोळ्यांसमोर पाणी - तीर्थोदक आणि तलावाच्या काठावर फडकणारे धर्मध्वज!
मस्तच लिहिले आहेस. माझी एक मैत्रीण नुकतीच राजस्थानला गेली होती. तिने काही माहिती सांगितली आणि फोटोही दाखवले होते. पण ते मनावर काही ठसले किंवा उमटले नाही.
उत्तर द्याहटवातुझ्या बीकानेर से लेखानी आणि छायाचित्रांनी शब्दचित्र आणि चित्रशब्द उत्तम उभे केले आहे.
फोटो सुंदर आणि शीर्षके चपखल.
उत्तर द्याहटवाफोटो आणि वर्णन दोन्ही सुंदर आहे. प्रत्यक्ष न जाताही गेल्याचा आनंद मिळाला.
उत्तर द्याहटवापाठवल्याबद्दल धन्यवाद.
- श्रीकृष्ण पंडित
आपण केलेलं प्रवास वर्णन म्हणजे वाचकांना बिकानेरी मिठाईची मेजवानी. प्रवासात भेटलेली नर्मदा वाचकास नकळत तिच्या परिक्रमेची आठवण करून देते. गढी, राजवाडे, त्यातील कलाकारी पूर्वीच्या वैभवाची, प्रगत भारतीय तंत्रज्ञानाची आठवण करून देते. Drawing is the language of Engineer या न्यायाने आपण काढलेली छायाचित्र बरंच कांही सांगून जातात. अखेरीस प्रवास महत्वाचा आहे मुक्काम स्थळावर पोहोचणे नव्हे.
उत्तर द्याहटवा- श्रीराम वांढरे
दगडी इतिहासाच्या पार्श्वभूमीवर काँक्रीटचा वर्तमानकाळ, टमटममधली खुशी आणि उत्सव, न पाहिल्याची हुरहूर वाचकांपर्यंत पोचवणारे महाराणा प्रताप... सारंच सुंदर.
उत्तर द्याहटवाअगदी खिडकीतून डोकावल्यासारखं वाटतंय वाचताना...
उत्तर द्याहटवा- उमेश घेवरीकर, शेवगाव
वा. ओघवत्या भाषेत तुम्ही फार सुंदर प्रवास चित्रे टिपली आहेत.
उत्तर द्याहटवा