('संजू'निमित्त पाच वर्षांपूर्वीचं, २५ मार्च २०१३ रोजी लिहिलेलं हे पद्य नसलेलं गद्य पुन्हा सादर. संजूबाबाला
तुरुंगात जावं लागणार, या कल्पनेने भल्याभल्यांचं काळीज तेव्हा पिळवटून गेलं होतं.)
------------------------------------
आई-बापाविना
बिचारा पोर।
टपले त्याला ठरविण्या चोर।
थोरा-मोठ्यांच्या जिवाला घोर।
कसा बा अडकला।।
टपले त्याला ठरविण्या चोर।
थोरा-मोठ्यांच्या जिवाला घोर।
कसा बा अडकला।।
आई त्याची ‘मदर
इंडिया’।
तात जणू ‘फादर इंडिया’।
हा तर ‘सन ऑफ इंडिया’।
तळपत सदा राहो।।
तात जणू ‘फादर इंडिया’।
हा तर ‘सन ऑफ इंडिया’।
तळपत सदा राहो।।
दिधली कोण्या ‘दादा’ने संदूक।
खेळत होता खेळ दंबूक दंबूक।
अचानक तिची झाली बंदूक।
पाशी कैसा फसला।।
खेळत होता खेळ दंबूक दंबूक।
अचानक तिची झाली बंदूक।
पाशी कैसा फसला।।
चक्रव्यूहात
सापडे ‘अर्जुन’।
आता लागला मार्गा सज्जन।
त्यजुनि व्यसने करितो भजन।
गांधीबाबा की जय।।
आता लागला मार्गा सज्जन।
त्यजुनि व्यसने करितो भजन।
गांधीबाबा की जय।।
तरुणाईत पाऊल
पडले वाकडे।
विसरूयात सारे आपण गडे।
भद्रजनांचे अवघ्या साकडे।
माफ करा तया।।
विसरूयात सारे आपण गडे।
भद्रजनांचे अवघ्या साकडे।
माफ करा तया।।
सपा, काँग्रेस नि ‘राष्ट्रवादी’।
विसरून आपसांतील वादावादी।
म्हणती सावरून घ्या, द्या एक संधी।
बाळ ते निरागस।।
विसरून आपसांतील वादावादी।
म्हणती सावरून घ्या, द्या एक संधी।
बाळ ते निरागस।।
न्यायाचा हाती
होता तराजू।
असे कोणी मार्कँडेय काटजू।
तयांचीही असे दयेची आरजू।
वाचाळले कधीचे।।
असे कोणी मार्कँडेय काटजू।
तयांचीही असे दयेची आरजू।
वाचाळले कधीचे।।
डिग्गीराजा, जया, गुड्डी, सिन्हा।
वात्सल्याचा तयांना फुटला पान्हा।
महाभारती या सारे बनले कान्हा।
पोपट सारे मिठू, मिठू।।
वात्सल्याचा तयांना फुटला पान्हा।
महाभारती या सारे बनले कान्हा।
पोपट सारे मिठू, मिठू।।
कसला भारी तो
अॅक्टर।
मुन्नाभाई बने ‘डॉक्टर’।
‘बापूं’चा सिनेमॅटीक फॅक्टर।
लगे रहो, लगे रहो।।
मुन्नाभाई बने ‘डॉक्टर’।
‘बापूं’चा सिनेमॅटीक फॅक्टर।
लगे रहो, लगे रहो।।
कारागृही जर ‘बाबा’
जाईल।
नुकसान कोटी कोटीचे होईल।
दुनिया चंदेरी काळवंडून जाईल।
ध्यानी जरा घ्या ना।।
नुकसान कोटी कोटीचे होईल।
दुनिया चंदेरी काळवंडून जाईल।
ध्यानी जरा घ्या ना।।
निर्माते, दिग्दर्शक नि नट।
कसे भरतील मग पोट?
पिक्चरांची लागेल वाट।
चित्र काळेकुट्ट।।
कसे भरतील मग पोट?
पिक्चरांची लागेल वाट।
चित्र काळेकुट्ट।।
असशील माझ्या
देशा महान।
परि तू बॉलीवूडहून खूप लहान।
आता तरी पटवून घे ही खूण।
ओळख स्वतःला।।
परि तू बॉलीवूडहून खूप लहान।
आता तरी पटवून घे ही खूण।
ओळख स्वतःला।।
झाले होते
बॉम्बस्फोट खरे।
दगावली होती कर्ती-बाया-पोरे।
कशाला आठवावे जुने सारे?
जखम वाहे भळभळा।।
दगावली होती कर्ती-बाया-पोरे।
कशाला आठवावे जुने सारे?
जखम वाहे भळभळा।।
कसली शस्त्रे? कसला कायदा?
पाळून कोणाचा झालाय फायदा?
आता हवा आहे एकच वायदा।
पोराला सोडावे।।
पाळून कोणाचा झालाय फायदा?
आता हवा आहे एकच वायदा।
पोराला सोडावे।।
जुने जाऊ द्या
मरणालागुनि।
जाळुनि किंवा टाका पुरुनि।
केशवसुत ते गेले सांगुनि।
आठवा जरा।।
जाळुनि किंवा टाका पुरुनि।
केशवसुत ते गेले सांगुनि।
आठवा जरा।।
- ‘कायद्याशी सविनय’ आम आदमी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा