मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमी...मराठीतली नि इंग्रजीतली

  ‘वागशीर’ला जलावतरणानिमित्त तुताऱ्यांनी सलामी. (छायाचित्र नौदलाच्या संकेतस्थळावरून साभार.) बातमी म्हणजे काय? तिची व्याख्या? पत्रकारितेचं औपचारिक शिक्षण घेणाऱ्यांना आठवेल कदाचित की, ‘बातमी’ आणि ‘बातमी-लेखन’ विषय शिकविणाऱ्या कोण्या मुरब्बी पत्रकारानं त्यांना पहिल्याच तासाला हा प्रश्न विचारला असेल. त्यानंतर पाच-सहा-सात व्याख्या पुढे आल्या असतील. त्यातली NEWS : North-East-West-South ही सोपी, सुटसुटीत व्याख्या बहुतके भावी पत्रकारांना पटली असेल. सोपी व्याख्या आहे ती. बातमीत काय हवं? तर त्यात ‘5 W & 1 H’ ह्याची (Who? What? When? Where? Why? How?) उत्तरं मिळायला हवीत. कोण, काय, का, कधी, कुठे आणि कसे, हे ते सहा प्रश्न. मराठीत सहा ‘क’ -  विद्यार्थ्यांना हेही शिकवलं जातं. ‘Comment is free, but facts are sacred.’ वयाच्या सव्विसाव्या वर्षी ‘द मँचेस्टर गार्डियन’च्या (आताचं प्रसिद्ध दैनिक द गार्डियन) संपादकपदी नियुक्ती झालेल्या सी. पी. स्कॉट ह्यांचे हे प्रसिद्ध उद्धृतही जाणत्या पत्रकार-संपादकानं विद्यार्थ्यांना ऐकवलं असेलच. बातमी देणं किती जोखमीचं काम आहे, हेच शिकवायचं असतं त्यातून. का...

मुंबईच्या धावत्या दौऱ्यातील नोंदी

‘लोकसत्ता-तरुण तेजांकित’ ठरलेला ओंकार कलवडे. त्याच्या ह्या कार्यक्रमानिमित्तच मुंबईचा धावता दौरा झाला. गोष्ट जुनी आहे; पण शिळी नाही. अगदी आठवडाभरापूर्वीची. मार्चअखेरीची. लिहू लिहू म्हणताना उशीर झाला. ‘मायानगरी’, ‘मोहनगरी’ म्हणविल्या जाणाऱ्या मुंबईला गेलो होतो. देशाची आर्थिक राजधानी आणि आर्थिक वर्षाची अखेर. पण हा केवळ योगायोग. निमित्त वेगळंच होतं. मुंबई फिरायची, फिरत फिरत पाहायची बाकी आहेच. तिथला जगप्रसिद्ध वडा-पाव खायचा आहे. ‘माहीम हलवा’ घ्यायचा आहे. फॅशन स्ट्रीटला जाऊन घासाघीस करीत मस्त कपडे-खरेदीचा आनंद लुटायचा आहे. पुस्तकांचे ढीगच्या ढीग उचकून एखादं-दुसरं पुस्तकं बाळगायचं आहे. नॅशनल बुक ट्रस्टचं कार्यालय समुद्राच्या समोर आहे. तिथं जायचं आहे. असं खूप खूप करायचं आहे. त्याला मुहूर्त काही लागत नाही... फार वर्षांपूर्वी, बरोबर पाच दशकांपूर्वी तब्बल महिनाभर ह्या महानगरीत राहिलो होतो. माझ्या आत्येभावानं - नानानं बऱ्याच ठिकाणी फिरवलं होतं. तो अकलूजहून तिथं रुजू पाहत होता. त्याचा मोठा भाऊ - आप्पानं मिसळ-पावची दीक्षा दिली होती. तेव्हा ‘उषाकिरण’ म्हणे तिथली सर्वांत उंच इमारत होती. आता सूर्याच्...