मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

अशोकला आठवताना...

अशोक... 'फोन वाजला की भीतीच वाटते. सध्या जगणं म्हणजे अगतिकता, अस्थिरता, अस्वस्थता एवढंच आहे.' व्हॉट्सॲप मेसेजमध्ये स्वातीताईंनी लिहिलं होतं. स्वातीताई म्हणजे दिवंगत लेखक लक्ष्मण लोंढे ह्यांच्या पत्नी. त्यांच्याशी शुक्रवारी सकाळी झालेला संवाद. हा भीतिदायक फोन वाजायचंच बंद केलं तर? म्हणजे गुरुवारी दुपारनंतर मला ते जमलं असतं तर? तू व्हेंटिलेटरवर असल्याचा अभिजितचा निरोप वाचून फोन बंदच करून ठेवायला पाहिजे होता. कारण मग एकामागून एक वाजत गेलेले फोन मला ऐकू आलेच नसते. अर्थातच् ती बातमीही कळली नसती. अज्ञानातील काही तास समाधानाचे गेले असते. 'ह्यातून बरा होणार तो. माझा त्याच्यावर विश्वास आहे,' असा दिलासा मी अभिजितला, तुझ्या लाडक्या लेकाला कोणाच्या जिवावर दिला होता? तुझ्याच ना! कोण कुणाला दिलासा देत होतं? मी त्याला की मी मला च ? साधारण वर्ष-दीड वर्षापूर्वी लेखक पुरुषोत्तम बोरकर गेले. त्यांच्या आठवणी लिहिल्या. त्या लेखावर डॉ. हेली दळवी ह्यांनी प्रतिक्रिया दिली होतं की, 'असंच लिहीत चला. पण शक्यतो असल्या माणसांच्या हयातीत. म्हणजे त्यांना भेटण्याची संधी हुकल्याची चुटपुट कमी होईल....

पुस्तकवाटेवरचा प्रवास

  आपल्याकडं स्वतःची पुस्तकं असावीत, त्याच्या पहिल्या पानावर मालकी सांगणारी आपली सही असावी, अमूक एक पुस्तक संग्रहात आहे, हे अभिमानानं सांगता यावं, असं नेमकं कधीपासून वाटायला लागलं? ...पुस्तकवाटेवरचा उलगडलेला प्रवास. ------------ ------------ ------------ एखादी कविता आपल्या वाचण्यात खूप उशिरा येते. कवीला त्यातनं जे सांगायचं आहे, ते मात्र आधीच कधी तरी माहीत होऊन गेलेलं असतं; नकळतपणे जाणवतं. ती कविता अशीच कधी तरी 'भेटते', तेव्हा आनंद होतो खरा; पण तो नवं काही गवसल्याचा नसतो. समानधर्मा सापडल्याची खुशी असते ती. किंवा ह्यानं अगदी आपल्या मनातलंच कसं मांडलंय, असं वाटतं. अरेच्चा, आपल्याही खूप आधी कुणाला तरी हे सुचलेलं होतं, असं मनाशी म्हणतो. सफदर हाशमी ह्यांच्या 'किताबें' कवितेची गोष्ट अशीच. लेखक-कवी दासू वैद्य ह्यांनी केलेला 'किताबें'चा अनुवाद पंचवीस-एक वर्षांपूर्वी दैनिक लोकमतने मोठ्या देखण्या पद्धतीनं छापला. डाव्या बाजूला चार-पाच-सहा शब्दांच्या ओळींमागून ओळी, पुस्तकाची महती सांगणाऱ्या. आणि उजवीकडे पुस्तकांचा ढीग रेखाटलेला. त्यावर ज्ञानेश्वरी, तुकारामबुवांची गाथा, विश्व...