मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...

बातमीच्या पलीकडे...बळीचा बकरा?

सा धारण तीन महिन्यांपूर्वी एबीपी माझा वृत्तवाहिनीने ' डिजिटल महाराष्ट्र ' असा दिवसभराचा परिसंवाद आयोजित केला होता. त्यातील एक सत्र '' ट्रोल ' धाडी ' बद्दलचे होते. सामाजिक माध्यमांवर कसं, किती नि कोणत्या पातळीवर जाऊन ' ट्रोल ' केलं जातं, ह्याचे किस्से व भीषण अनुभव एक अभिनेता, एक सामाजिक कार्यकर्ता ह्यांनी त्यात सांगितले. पुढच्या वर्षी ह्याच विषयावर सत्र आयोजित करून त्यात ' एबीपी माझा ' चे संपादक राजीव खांडेकर आणि प्रतिनिधी राहुल कुलकर्णी ह्यांना बोलायला सांगितलं पाहिजे. कारण दोघांनी गेले दोन दिवस ह्याचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. निमित्त वांद्र्यात झालेल्या गर्दीचं. वांद्र्यात मंगळवारी (दि. १४ एप्रिल) झालेली गर्दी, त्यावरून उठलेली राळ, पत्रकारासह दोघांना झालेली अटक हा सगळा घटनाक्रम दोन दृष्टिकोणांतून पाहायला हवा. राजकारण आणि पत्रकारिता . (त्यातील उपविभाग म्हणजे पत्रकारितेतील राजकारण !) एका बातमीची ' मोठी चूक ' संपादक व प्रतिनिधी यांना भोवली, असं सकृतदर्शनी तर दिसत आहे. मुंबईतल्या वांद्रे पश्चिम उपनगरी रेल्वेस्थानकाबाहे...

इंग्लडला इटलीचे पत्र : तुमच्या भविष्यात हे वाढून ठेवलंय...

इटली सरकारने पूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर निर्मनुष्य दिसणारे रोम. (सौजन्य - theguardian.com) अ जूनही आटोक्यात येत नसलेल्या कोरोनाव्हायरसच्या साथीने युरोप खंड हवालदिल झालेला आहे. इटली, स्पेन आणि त्या पाठोपाठ इंग्लंडमधील परिस्थितीही चिंताजनक आहे. या साथीत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी २९.४७ टक्के रुग्ण इटली व इंग्लंड ह्या दोन देशांतील आहेत. युरोपातील स्थिती अजून अतिगंभीर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी (दि. ७ एप्रिल) स्पष्ट केले. खुद्द ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन अतिदक्षता विभागात दाखल आहेत. जीवरक्षक प्रणालीचा उपयोग करण्याची वेळ आलेली नाही, हेच सुदैव.   जागतिक आरोग्य आणीबाणी असलेल्या या साथीच्या काळात युरोपमधील या दोन महत्त्वाच्या देशांमध्ये काय साम्य आहे ? इटलीच्या प्रसिद्ध कादंबरीकार फ्रांचिस्का मिलांद्री यांनी खुले पत्र लिहून ते दाखवून दिलं आणि ब्रिटिशांना जणू सावध केलं. ' द गार्डियन ' दैनिकानं २७ मार्च रोजी त्यांचं हे पत्र प्रसिद्ध केलं. आमच्याच वाटेनं तुमचा प्रवास सुरू आहे, असं त्यांनी ब्रिटिश नागरिकांना सांगितलं. हे एक हजार शब्दांचं पत्र...