मुख्य सामग्रीवर वगळा

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

स्वच्छ हिवरेबाजार - काय म्हणतात पोपटराव पवार?

ग्रामस्वच्छता अभियानातील हिवरेबाजारच्या ऐतिहासिक यशाची
कहाणी उलगडून दाखविणारी मुलाखत

हिवरेबाजारच्या ग्रामस्वच्छता अभियानाच्या यशाबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या योगदानाबद्दल माहिती. सरपंच श्री. पोपटराव पवार यांची मुलाखत.

पुरस्कारांच्या मागे न धावता गावामध्ये काम करण्याचा
गृहपाठ कसा करावा, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिवरेबाजार!
तब्बल एक दशकानंतर पुन्हा एकदा राज्यस्तरीय यश मिळाले.
त्याचे रहस्य उलगडून सांगणारी हिवरेबाजारचे सरपंच श्री. पोपटराव पवार ह्यांची विशेष आणि मनमोकळी मुलाखत.
...............
‘गाव बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले, तेव्हापासून आजपर्यंत आम्ही कधीच पैशाच्या किंवा पुरस्कारांच्या मागं लागलो नाही. लोकसहभाग, श्रमदान, लोकवर्गणी ह्यातून गावात सुधारणा करणं हाच आमचा उद्देश होता, आहे आणि राहील. लोकांचा सहभाग वाढावा आणि कामात सातत्य राहावं, एवढ्याच एका हेतूने आम्ही संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत यंदा सहभागी झालो.’ राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष श्री. पोपट पवार नेमकेपणानं गावकऱ्यांच्या वतीनं भूमिका स्पष्ट करतात.

श्री. पवार हिवरेबाजारचे सरपंच झाले आणि त्यांनी आदर्श गावाची संकल्पना सर्वांच्या मनात रुजविली. त्यासाठी सुरू झालेल्या कामांतून गावाचा कायापालट होऊ लागला. हे एकट्याचं काम नाही. सर्वांना बरोबर घेतल्यानंच पुढे जाता येईल, हे त्यांनी सुरुवातीपासूनच जाणलं होतं. त्यामुळेच हिवरेबाजारमध्ये गेल्या ३०-३५ वर्षांत झालेल्या घडामोडींमध्ये ठळकपणे जाणवतो तो लोकसहभाग.

पारितोषिकाचं मर्म कशात?

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छ हिवरेबाजारला यंदा मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकाचं मर्म कशात आहे? या प्रश्नावर श्री. पवार म्हणाले, ‘‘विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची गावकऱ्यांना जी सवय लागली, त्याचा हा दृश्य परिणाम आहे. लोकसहभाग हा आमचा परवलीचा शब्द आहे. त्यानं भल्याभल्या समस्या पळून जातात. लोकसहभागातून सगळं काही करता येतं, हे गावाला अनुभवातून पटलं आहे. ग्रामस्वच्छता अभियानात आम्हाला १० वर्षांपूर्वीही राज्यस्तरीय पहिलं पारितोषिक मिळालं होतं. त्यामुळं आमचा गृहपाठ पक्का होता. जुन्या कामावर आम्ही कधीच नव्यानं बक्षीस मिळवलं नाही.’’

‘‘एकदा अभियानात सहभागी व्हायचं ठरवल्यावर गावकरी जिद्दीनं कामाला लागले. प्रत्येक मोहिमेत आम्ही नवीन टीमवर जबाबदारी टाकतो. त्यामुळं काम करणारे तयार होतात. यंदाच्या मोहिमेसाठी टीम तयार केली, जबाबदारीचं वाटप झालं. साहित्याची खरेदी, काम, त्याचा दर्जा तपासणं आणि एकूण मोहिमेचा सर्वंकष आढावा घेणं, यासाठी वेगवेगळे गट तयार केले. त्यातली माणसं गावातल्या वेगवेगळ्या स्तरातली होती,
’’ असं श्री. पवार ह्यांनी स्पष्ट केलं.

प्रत्येक कामाची तपशीलवार नोंद

‘‘जबाबदारी मिळाली की, त्यानुसार हे गट कामाला लागले. असं वेगवेगळ्या पातळ्यांवर बारीक लक्ष ठेवल्यानं केलेली कामं टिकतात, हा अनुभव आहे. आम्ही प्रत्येक कामाची तपशीलवार नोंद ठेवतो. हे सगळं रेकॉर्ड विभागीय आयुक्त श्री. महेश झगडे यांनी तपासणीच्या वेळी स्वतः पाहिलं. त्यावर ते पूर्ण समाधानी दिसले.’’

यंदाच्या मोहिमेत पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळेल, याची कितपत खात्री होती श्री. पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना?

श्री. पवार म्हणाले,
‘‘खरं सांगतो. पेपर पूर्ण आत्मविश्वासानं १०० टक्के सोडवला होता. त्यामुळे यश अपेक्षितच होतं. त्याचं संपूर्ण श्रेय विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना. विविध स्तरांवरच्या समित्या मोहिमेत सहभागी झालेल्या गावांची पाहणी करतात. या सर्व समित्यांपुढे गावकरीच बोलले. जे केलं, तेच दाखवायचं आणि सांगायचं असल्यामुळं अजून वेगळं काही करायचा प्रश्नच नव्हता.
’’

सर्वांत मोठं श्रेय विद्यार्थ्यांना

ह्या मोहिमेत १० वर्षांनी पुन्हा भाग घेण्याचं आम्ही एकमतानं ठरवलं. राज्य पातळीवरचं पहिलं पारितोषिक मिळवण्यात सर्वांचा वाटा आहेच; पण त्याचं सर्वांत मोठं श्रेय मी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना देतो. त्यांनी हे मनावर घेतलं आहे. त्यांच्यामुळेच घराघरामध्ये जागृती झाली, असं म्हणताना श्री. पवार ह्यांनी सर्वांना योग्य ते श्रेय दिलं.

घनकचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा जगापुढचा सध्याचा फार मोठा प्रश्न आहे. योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावता आली, तर स्वच्छतेच्या वाटेवरचा मोठा अडथळा आपोआप दूर होतो, असं श्री. पवार म्हणाले,

‘‘कचऱ्याचं वर्गीकरण करून, ओल्या कचऱ्याचा कंपोस्ट खत बनविसाठी उपयोग करून आम्ही आमच्या पद्धतीनं मार्ग शोधला. सांडपाण्याच्या पुनःवापराचंही असंच आहे. प्लास्टिकबंदी अलीकडे झाली. आमच्याकडे सवयीनं आधीच प्लास्टिकचा कचरा वेगळा केला जात असतो. गावात स्वच्छता राहण्याचं नि टिकण्याचं ते एक कारण आहे.
’’

मुलांमुळे पालकांना सवय

स्वच्छतागृहांचा वापराबाबत श्री. पवार म्हणाले, ‘‘वापर करण्याची सवय लागणंही महत्त्वाचं आहे. महात्मा गांधी स्वतः शौचालयाची-स्वच्छतागृहाची सफाई करीत. आमच्या शाळेतील मुलांना ती सवय आहे. शाळेसारखंच ते घरीही वागतात आणि त्यामुळं त्यांच्या पालकांनाही आपोआप ही सवय लागली.’’

हिवरेबाजारच्या ह्या दीर्घ काळच्या वाटचालीचं रहस्य श्री. पवार सहजपणे उलगडून दाखवतात. आमच्याकडे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर नाही. रस्त्यावरून वाहणारं सांडपाणी दिसत नाही. मूलभूत सोयी मिळाल्या की, लोक कोणत्याही कामात उत्साहानं सहभागी होतात, हाच आमचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळेच श्रमदानात सारे उत्स्फूर्तपणे भाग घेतात. आपल्याकडे दुर्दैवाने सगळं मजुरांकडून करून घ्यायची सवय लागली आहे. ती आमच्या गावात नाही, असं ते म्हणाले.

हिवरेबाजारमध्ये ह्या वर्षी (२०१६-१७) प्रामुख्यानं शोषखड्ड्यांचं आणि स्वच्छतागृहांच काम लक्षणीयरीत्या झालं. गावातील शौचालये पाहून बाहेरगावाहून आलेला एक पाहुणा श्री. पवार ह्यांना म्हणाला, ‘तुम्हाला बहुतेक सरकारकडून जास्त पैसे मिळतात. म्हणून एवढं चांगलं काम होतं.’

अधिक चांगलं काम? एकत्रित खरेदी!

वस्तुस्थिती वेगळीच आहे. इतर सर्व गावांप्रमाणे आणि लाभार्थींप्रमाणे हिवरेबाजारमध्ये सरकारकडून शौचालयासाठी १२ हजार रुपयांचंच अनुदान मिळतं. तेवढ्याच अनुदानात इतर गावांपेक्षा इथं अधिक चांगलं काम होण्याचं कारण आहे एकत्रित खरेदी. हिवरेबाजारमध्ये बांधल्या गेलेल्या शौचालयाचा खर्च बाजारभावाप्रमाणे २१ हजार ३०५ रुपये आहे. पण सगळं साहित्य एकत्रित खरेदी केल्यामुळे, त्याची एकदम वाहतूक केल्यानं गावातील प्रत्येक लाभार्थीला त्यासाठी १७ हजार ७६५ रुपये खर्च आला. एकत्रित खरेदीमुळं प्रत्येकाचे ३ हजार ५४० रुपये वाचले.

ही सगळी माहिती देऊन श्री. पवार म्हणाले,
‘‘ठरवलं तर सगळं काही करता येतं. आम्ही ते केलं.’’ यंदाच्या परीक्षेत अव्वल नंबर आला म्हणून सगळं गाव खूश आहे. पण म्हणून गावकरी आत्मसंतुष्ट नाहीत. प्रगतीची पुढची शिखरं गाठण्यासाठी अभ्यास नेहमीसारखाच चालू ठेवावा लागणार, हे त्यांना माहीत आहे!
............
(महत्त्वाचे - ही विशेष मुलाखत स्वामित्व हक्काखाली (Copyright) सुरक्षित आहे. कृपया पूर्वपरवानगीशिवाय तो कुठेही कॉपी-पेस्ट करू नये. हा विचार जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखाची मूळ लिंक शेअर करावी, ही नम्र विनंती.)
............
हिवरेबाजारच्या यशाची कहाणी तुम्हाला वाचायला नक्कीच आवडेल 👇


टिप्पण्या

  1. आपल्या कुशल लेखणीतून 'आधी केले मग सांगितले', 'झपाटलेलं व्यक्तिमत्व', 'अधुनिक गाडगे महाराज', 'आधी Practical नंतर Theory' असा पोपटराव पवारांचा प्रवास उलगडतो.
    - श्रीराम वांढरे, भिंगार (नगर)

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ---------- हा लढा केवळ एका अक्षराचा नाही. मराठीच्या अस्मितेचे अढळपद टिकवून ठेवण्याचा संघर्ष आहे.  'तिलक' किंवा 'जलगाव' ही मोडतोड थांबविण्यासाठी पुण्याच्या श्री. प्रकाश निर्मळ ह्यांनी केंद्रीय मंत्रालयांपर्यंत चिवट पाठपुरावा केला. केंद्रीय हिंदी संचालनालयाने अखेर विस्तारित वर्णावलीत 'ळ'  स्वीकारला. ऋग्वेदापासून ते आधुनिक उपबोलींपर्यंत ५० कोटी जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या 'ळ' अक्षराची ही रंजक भाषिक यात्रा. सोबत प्रकाश निर्मळ ह्यांची मुलाखत... ---------------- ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्...

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...
html