मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...

खोडलेले ‘अ-क्षर’!

‘ क्षमस्व !’   या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या  ‘ लोकसत्ता ’ च्या त्या चौकटीत  ‘ मी मन : पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो ’  असं प्रथम पुरुषी एकवचनी वाक्य आहे. याचा अर्थ ही दिलगिरी सामूहिक नसून एकट्या संपादकाची आहे . त्याच्याशी त्यांच्या संपादकीय मंडळाचा किंवा व्यवस्थापनाचा काहीही संबंध नाही. ह्याचा अर्थ असा की, याबाबत आम्ही संपादकांच्या मागे नाहीत किंवा आमचा त्यांना अजिबात पाठिंबा नाही, हे व्यवस्थापनाने न बोलताही दाखवून दिलं आहे ! ---------------------- वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासून (मराठी) वृत्तपत्रं वाचतो आहे. पोटासाठी म्हणून २८ वर्षं वृत्तपत्रातच काम करतो आहे. कुणी तरी काम करताना दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे किंवा कुणाच्या हातून नकळत झालेली ‘ गल्लत-गफलत ’ आणि त्यावरून झालेला ‘ गहजब ’ याची चौकट अधूनमधून कोणत्या ना कोणत्या वर्तमानपत्रात ‘ दिलगिरी ’ , ‘ माफी ’ , ‘ क्षमस्व ’ ...अशा कुठल्या तरी एका शीर्षकाखाली दिसायचीही. नंतर नोकरी सुरू केल्यावर अशी चौकट आपल्या अंकात (आणि तीही आपल्यामुळं) छापून आली, तर तो दिवस वाईट जायचा. आणि तशीच चौकट प्रतिस्पर्धी अंकात दिसली ...